Top News

सर्वोदय विद्यालय, बाल्हारशाह ची एसएससी बोर्ड परीक्षेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.

सर्वोदय विद्यालय, बाल्हारशाह ची एसएससी बोर्ड परीक्षेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.


बाल्हारशाह शहरातील सेमी इंग्रजी माध्यमातून सर्वोदय विद्यालयाचा दहावीचा निकाल 89.04%



सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांच्या जोरावर सर्वोदय विद्यालय, बाल्हारशाह यांनी यंदाही एसएससी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  स्वरुप प्रविण वासेकर याने 91.80% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला, कु. रुषाली दिलीप फटाले हिने 86.60% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला, तर कु. अनुष्का राजेंद्र ठेंगणे हिने 84% गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला.

सर्वोदय विद्यालयातील एकूण 73 विद्यार्थ्यांनी 10 वी ची परीक्षा दिली. यामध्ये प्राविण्य श्रेणीत 11 विद्यार्थी तसेच प्रथम श्रेणीत 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

यशस्वी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे म. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष संजय कायरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी गजभे, पर्यवेक्षिका पाजनकर, वर्ग 10 वी च्या वर्गशिक्षिका बुटले, वर्गशिक्षक गाडगीलवार तसेच सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक व पालकांना दिले.

Previous Post Next Post