नागभीड : मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ, आरमोरी संचालित राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथे डॉ. जी. डी. देशमुख यांची प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली. संस्थेचे सचिव मनोज वनमाळी यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
नियुक्तीनंतर महाविद्यालयातील प्राध्यापकांनी डॉ. देशमुख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले. डॉ. देशमुख हे याच महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांनी सलग चार वर्षे कार्यकारी प्राचार्य म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील दोन दशकांहून अधिक अनुभव असलेल्या डॉ. देशमुख यांनी सात पुस्तके प्रकाशित केली असून अनेक संशोधन निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये त्यांनी सहभाग नोंदविला आहे. ते गोंडवाना विद्यापीठांतर्गत पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका संशोधकाला डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे, तर तीन संशोधक सध्या संशोधन कार्य करीत आहेत.
त्यांच्या नियुक्तीबद्दल डॉ. विकास मोहतुरे, प्रा. निलेश गोडे, डॉ. राजेंद्र चव्हाण, डॉ. रत्नप्रभा रुडे, डॉ. अतुल नागपुरे, प्रा. किशोर बोरकर, प्रा. प्रमोद डबले, डॉ. मनीष मत्ते, प्रा. चक्रधर भुर्रे, डॉ. अंकुश कायरकर, प्रा. धनंजय मडावी, प्रा. प्रेमकुमार खोब्रागडे, प्रा. प्रचल ढोक, प्रा. नीरा सिंग, प्रा. श्रीकांत वनमाळी यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी नरेश देसाई, अक्षय वनमाळी, सुमित बोंदरे, प्रदीप मोहुर्ले, राजेश कोरे, दीपक समर्थ, आशिष कांबळे, वसंत नागोसे, अंकुश समर्थ व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
