Top News

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा....डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचनाचे महत्त्व अधोरेखित




नागभीड : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाला डॉ. विकास मोहतुरे, डॉ. निलेश गोडे, डॉ. अंकुश कायरकर, ग्रंथपाल प्रा. चक्रधर भुर्रे, प्रा. पावन श्रीरामे, कु. जोस्ना राखडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांच्या जीवनात वाचनाचे महत्त्व विशद करताना, ‘वाचाल तर वाचाल’ हा विचार विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचारांना दिशा मिळते आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. विकास मोहतुरे यांनी आपल्या मनोगतात वाचनाचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. ‘वाचन हा ज्ञानग्रहणाचा खरा मार्ग आहे,’ असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासावी, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Previous Post Next Post