समर्थ भुडके चे अबॅकस स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर यश
विदर्भ माझा न्युज 24 - तेल्हारा : मनोज भगत : विषेश प्रतिनिधी
25 जानेवारी रोजी कोल्हापुर येथे राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेचे आयोजन संपन्न झाले त्या स्पर्धेमध्ये हिवरखेड येथील समर्थ मनीष भुडके या विद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केले आहे या आदि ही समर्थने राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत अमरावती येथे प्रथम येऊन यश प्राप्त केले होते.
समर्थ अकॅडमी हिवरखेड येथे शिकत असलेला समर्थ मनीष भुडके यांने अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून राष्ट्रीयस्तरावर आपले नाव चमकवले आहे. समर्थ अकॅडमी मधून बरेच विद्यार्थी परीक्षेला बसले होते यामधून समर्थ राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त करणारा पहिला विद्यार्थी ठरला आहे.
त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे त्याने आपल्या यशाचे श्रेय शिक्षिका प्रियंका राजपूत व आपल्या आई,वडिलांना दीले.
