सर्वोदय विद्यालय बल्हारशाह येथे सायबर क्राईम आणि आहार विषयक मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न....
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
दिनांक 27 जानेवारी 2024 रोज शनिवारला सर्वोदय विद्यालय बल्हारशाह येथे सायबर क्राईम आणि आहार विषयक मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका गजभे, बल्हारशाह पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्राची राजूरकर , तसेच डॉ.अनुमिता हिवरे स्त्री रोग तज्ञ तसेच सेवानिवृत्त शिक्षक पंदीलवार कार्यक्रमास उपस्थित होते.
राजूरकर यांनी सायबर क्राईम, मोबाईलचे दुष्परिणाम , पोस्को कायदा तसेच इतर संबंधित कायदे विषयी माहिती तसेच डॉ.हिवरे यांनी आहार विषयक माहिती,मुलांचे शारीरिक आरोग्य ,
किशोरवयीन मुलींच्या समस्या, बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे आजार यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचलन सौ. मेघा खान यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.बुटले यांनी केले.



