सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालय नागभीड येथे प्रजासत्ताक दिन साजरा...
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालय नागभीड, ता.नागभीड, जि.चंद्रपूर येथे 26 जानेवारी 2024 रोजी 75 वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळयाला समिधा सेवा संस्थे चे अध्यक्ष गणेश तर्वेकर, सचिव अजय काबरा तसेच पवन नागरे, निर्मला चिल्लूरे, संगिता आंबोरकर, अमित देशमुख, प्रविण बंडावार हे सदस्यगण तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.रेखा जीभकाटे आदी मान्यवर तसेच पालक व विदयार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी संस्थेचे सचिव अजय काबरा यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहन करण्यात आला. या वेळी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत गायण्यात आले व महाविद्यालयाचा परिसर विद्यार्थीनींच्या देशभक्तीपर नाऱ्यांनी दुमदुमला.
वार्षिक क्रिडा व सांस्कृतीक महोत्सवात अनेक स्पर्धा घेण्यात आल्या व या प्रजासत्ताक दिनानिमित्त ह्या स्पर्धा मध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यीनीना बक्षिस वितरण करण्यात आले या कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम् गीताने व विद्यार्थीनींना खाऊवाटप करून झाली.
या प्रतासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हिवदास कुंभरे, तर आभार प्रदर्शन प्रा. महेंद्र कोसे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाकर सावरकर,कुमारी रुखमीनी मानापूरे, ऐश्वर्या तर्वेकर व प्राध्यपक प्राध्यापीका व कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेतली.
