होली फेथ इंग्लिश प्राइमरी स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.
विदर्भ माझा न्युज 24 - तेल्हारा, विशेष प्रतिनिधी : मनोज भगत
हिवरखेड येथील होली फेथ इंग्लिश प्रायमरी स्कूल हिवरखेड मध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या समारंभाच्या अध्यक्ष स्थानी सीआरपीएफ चे माजी सैनिक संतोष भटकर होते.
आर्मी सोल्जर भटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला त्यानंतर मुख्याध्यापिका सौ अस्वार यांनी भटकर यांना शॉल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच प्रमुख अतिथी म्हणून गावाचे पोलीस पाटील प्रकाश गावंडे दादासाहेब देशमुख डॉक्टर प्रशांत इंगळे, डॉक्टर रामदास धुळे , सतीश इंगळे, डॉक्टर तारापूरे, जगन्नाथ महाकाळ, वार्ताहर मनोज भगत, गौतम इंगळे, अरुण राहणे ठाकरे, तेलगोटे, पालक वर्ग गावातील ज्येष्ठ नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
या दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे दिले देशभक्तीपर गीत गायन व नृत्यांचे सादरीकरण केले तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेडल प्रमाणपत्र व बक्षीस वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापिका कल्पना अस्वार यांनी केले संचालन शितल शेळके यांनी केले तर प्रमुख अतिथी डॉक्टर इंगळे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांची प्रगती मोठ्या प्रमाणात दिसून आल्याने त्यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले. त्यानंतर आभार सीमा सोनवणे यांनी केले तर कार्यक्रमाचे यशस्वीते करीता प्रिया वालचाळे, ममता इंगळे, शितल वानखडे, शितल अग्रवाल, शितल रेखाते, सोनू कुऱ्हाडे, पल्लवी फोपसे, प्रतिभा वाईकर, कुमुदिनी ढेगेकर, राजाराम इंगळे, गवारगुरू हागे, मनीष ताळे यांनी परिश्रम घेतले.
