Top News

BREAKING: मोह वेचायला गेला आणि परतलाच नाही… वाघाच्या हल्ल्यात भीषण अंत....मृतदेह पाहून गाव थरारले...

BREAKING: मोह वेचायला गेला आणि परतलाच नाही… वाघाच्या हल्ल्यात भीषण अंत....मृतदेह पाहून गाव थरारले...



नागभीड : तालुक्यातील मिंथुर येथे वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी संबंधित शेतकऱ्याचे अवशेष अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

हरिदास महादेव कुबडे (वय ५८) हे शनिवारी (दि. ४ एप्रिल) सकाळी मोहफुले वेचण्यासाठी शेतात गेले होते. मात्र सायंकाळपर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी चिंतेपोटी शोधाशोध सुरू केली.

सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास त्यांचा पुतण्या अक्षय हा शेतात शोध घेण्यासाठी गेला असता, त्याला वाघाची जोडी व तीन बछडे दिसून आले. त्यामुळे घाबरून तो तातडीने गावात परतला. त्यानंतर या घटनेची माहिती वनविभाग व पोलिसांना देण्यात आली.माहिती मिळताच वनविभाग व पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली; मात्र काहीच निष्पन्न झाले नाही. दरम्यान, रविवारी (दि. ५ एप्रिल) सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली असता, शेतात हरिदास कुबडे यांचे अवशेष छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले. मृतदेहाची अवस्था अत्यंत भीषण असल्याने वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्थानिकांमध्ये चर्चा असून, परिसरात वाघ, वाघीण व त्यांच्या तीन पिल्लांचा वावर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी भारती बगमारे यांनी मृतदेहाचे अवशेष शवविच्छेदनासाठी पाठवले असून, पुढील तपास वनविभाग व नागभीड पोलीस करीत आहेत. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post Next Post