Top News

नागभीड येथील राम मंदिर...!!

नागभीड येथील राम मंदिर...!! 


लेखक - पराग भानारकर...!!!


विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड 

       नागभीड तालुक्यातील एकमेव राम मंदिर नागभीड येथे स्थित आहे.. नागभीड ते नागपूर रोड हे डाव्या बाजूला हे राम मंदिर असून.. या मंदिरामुळे नागभीड च्या या मुख्य चौकाला राम मंदिर चौक हे नाव पडले आहे...!! 



• बांधकाम: प्रसिध्द साहित्यिक राजन जयस्वाल यांचे वडील स्व. पन्नालाल जयस्वाल यांचे बंधू मन्नालाल जयस्वाल यांच्या पत्नी स्व. चंद्रभागाबाई जयस्वाल यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्या मृत्यू नंतर प्रा.डॉ. राजन यांच्या व त्यांचे चिरंजीव अभिषेक जयस्वाल यांनी या राम मंदिराचे बांधकाम पूर्ण केले.. या बांधकामासाठी नर्मदाबाई पन्नालाल यांच्या यांनी ही  जागा दान दिली.. संपूर्ण  देशात 'मंदिर वही बनायेंगे' हा वातावरण असताना 'मंदिर यही बनायेंगे' म्हणत 1990 साली श्रीराम नवमी ला या मंदिराचे लोकार्पण झाले..!! 



       राम मंदिराचे संपूर्ण वास्तू मांडणी प्रा. डॉ. राजन जयस्वाल यांनी केलेली असून नागभीड येथील सीताराम ढोक व अमृतकर अश्या दोन कारागीरांनी आपल्या मजुरासोबत या राम मंदिराचे पूर्ण बांधकाम केले आहे.. सुरेश नागापूरे या नागभीड च्या पेंटर नी या मंदिराची रंगरंगोटी केली आहे.... मंदिराच्या एका बाजूच्या संरक्षक भिंतीवर आठ ठिकाणी महाराष्ट्राले आठही अष्टविनायक यांचे मूर्ती साकारलेली आहेत.. सदर मूर्ती हे नागभीड येथील मूर्तिकार रामदास अमृतकर यांनी तयार केलेल्या आहेत.. मंदिरात असलेल्या राम,लक्ष्मण,सीता यांच्या मूर्ती ता संगमरवरी दगडाच्या असून त्या जयपूर इथून मागविण्यात आलेल्या आहेत.. राम मंदिरात राम,लक्ष्मण,सीता यांचे दर्शन झाल्या नंतर लगेच महराष्ट्रातल्या आठही अष्टविनायक यांचे दर्शन जनतेला होते..!!!


• राम म्हटलं की तिथे रामाचा सच्चा सेवक अंजनीसूत हनुमान या येतोच आणी म्हणून राम मंदिरात प्रवेश घेतांना अगदी पायऱ्यांच्या बाजूला दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे.. या मंदिराचे वैशिष्ठ असे की सदर हनुमान मूर्ती ही हनुमानाचे शस्त्र गधा यांच्या आत मध्ये विराजमान आहे.. अश्या प्रकारचे विशिष्टपूर्ण हनुमान मंदिर इतरत्र कुठही आढळत नाही...!!!



• प्रवेशद्वार- या मंदिराचे प्रवेश द्वार हे राम हे राजा असल्याने राज मुकुटाच्या आकारचे आहे.. तर मधील भाग दिव्याच्या आकारचा आहे.. माणसाला आयुष्यात सुखासोबत सुरक्षा महत्वाची असते आपण देवा कडे हेच मागणे मागत असतो.. या मंदिरात प्रवेश करतांना दर्शन घेण्यासाठी जात असतांना मंदिराच्या दोन्ही बाजूला असलेल्या सुरक्षा भिंतीवरील धनुष्य व बाण यांच्या सुरक्षतेतून जावे लागते..प्रवेश करीत असतांना डाव्या बाजूला  सुरक्षा भिंतीवर आठ धनुष्य बाण प्रतिकृती आहेत..तर उजव्या बाजूला ऐंशी बाण आहेत.. रामायनातील उल्लेखा नुसार प्रभू राम चंद्राने आपल्या जीवनात ऐंशी बाण चालवले त्याचे हे प्रतिक आहेत..मंदिरात चढतांना सात पायऱ्या चढून जावे लागते.. आपल्या आयुष्यात सुद्धा सात महत्वाचे टप्पे असतात त्याचा हा भाग म्हणून सात पायऱ्या चढून मंदिरात जावे लागते..!! 


प्रवेश द्वाराच्या बाहेर दोन  जलकुंभ कलशाच्या आकारचे बांधले गेले होते त्यात चोवीस तास पाणी राहायचे  सध्या ते नाहीत मात्र त्या मागचा हेतू हा होता राम मंदिर चौक हे मुख्य असल्याने चोवीस तास येणाऱ्या प्रवासी वर्गाची तृष्णा भागवावी तसेच एखाद्या वेळी कुठे आगीची वैगरे घटना घडली तर पाणी लवकर मिळावे यासाठी हे  जलकुंभ उभारण्यात आले होते.. अनेक रहिवासी या कुंभाच्या पाण्यातून आपली पाण्याची गरज भागवत असत..!!!



• 'शस्त्र सिद्ध राम'

         राम मंदिराच्या मागील बाजूच्या भिंतीस मर्यादा पुरुषोत्तम रामाचे अप्रतिम असे छायाचित्र सुरेश नागापुरे या कलाकाराने काढले आहे..विश्व हिंदू परिषदेच्या कॅलेंडर वरील हे 'शस्त्र सिद्ध राम' म्हणजे भगवान राम यांनी वापरलेल्या सर्व शस्त्रासहित असलेले श्रीराम यांचे हे चित्र मंदिराच्या मागील बाजूस काढण्याचे हेतू हा आहे की मंदिराच्या मागील बाजूस काही अंतरावर सरकारी दवाखाना व स्मशान भूमी आहे .. यातून वापस येणाऱ्या दुःखी व आजारी लोकांना थेट रामाचे दर्शन व्हावे व त्यांना सुख समृद्धी लाभू दे यासाठी हात जोडता यावे यासाठी हे चित्र मागील बाजूस काढण्यात आलेले आहे...!!!

• धार्मिक कार्य -

       प्रा. डॉ. राजन यांच्या पत्नी सौ. पुष्पा राजन जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात  मुलगा अभिषेक राजन जयस्वाल, स्नुषा अनामिका अभिषेक जयस्वाल, मुलगी अभिलाषा राजन जयस्वाल, नातवंडे कु.रेवा,आर्या चि. आराध्य यांच्या सर्वांच्या वतीने दरवर्षी 1990 पासून सुरु असलेली परंपरा आजही कायम ठेवत राम नवमीला दरवर्षी नऊ दिवस महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.. गुढी पाडव्या पासून अष्टमी पर्यंत रोज रात्री कीर्तन व नवमीला 12 वाजता रामजन्म सोहळा व दुपारी कीर्तनाचा कार्यक्रम आयॊजीत करण्यात येतो.. यावेळी नागभीड तालुक्यातील असंख्य भाविक या ठिकाणी येत दर्शन घेत असतात. या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक  कार्यक्रम होत असतात व भाविक जनतेला विविध धार्मिक कार्यक्रमासाठी सदर परिसर विनाशुल्क देण्यात येतो...!!!


• विविध भेटी: हे राम मंदिर अगदी नागभीड - नागपूर रस्त्यावर असल्याने अनेक संत महंत यांनी भेटी दिलेल्या आहेत.. काही वर्षा पूर्वी सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत हे प्रांतप्रमुख असतांना मंदिरात सलग पाच दिवस मुक्कमी राहून या ठिकाणी शिबीर घेतल्याची एक स्मरणीय आठवण आहे.  या सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिराला भेट दिलेली आहे...!!!


• सदर मंदिराचे मूळ मालक हे अभिषेक राजन यांच्या हे असून त्यांच्या पुढाकारणे या मंदिरात या वर्षी अयोध्या येथील राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागभीड येथील राम मंदिरात उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला...!!!


 पराग भानारकर, नागभीड

         8275294552

( लेखक हे  सरस्वती ज्ञान मंदिर, नागभीड येथे सहा.शिक्षक असून लेखन हा त्यांच्या आवडता  छंद आहे..!!)

Previous Post Next Post