Top News

लेखक पराग भानारकर यांचे मनोगत ।

लेखक पराग भानारकर यांचे मनोगत ।


विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड 



 प्रिय, मित्र हो...


शब्दांची पूजा करत नाही मी

माणसांसाठी आरती गातो

ज्यांच्या गावात सूर्य नाही

त्यांच्या हातात उजेड देतो..!!

      अगदी गावखेड्यातून आलेला मी.. नागभीड ला येऊन आज 23 वर्षे झाले.. लहानाचा मोठा झालो.. आज 176 वा कार्यक्रम त्याचे सूत्रसंचालन करताना मन भरून आले...छोटया मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी मध्ये शिकत गेलो,चुकत जायचो आणी स्वतः मध्ये बदल घडवीत आज 176 व्या कार्यक्रमापर्यंत पोहचलो.. कार्यक्रम स्वरूप पाहून मी माझे शब्द आवरते घेतो.. या निमित्ताने माझी सगळ्यात मोठी उपलब्धी हे आहे की.. माझे विद्यार्थी माझ्या मार्गदर्शनात छोट्या मोठ्या कार्यक्रमाचे संचालन करतात यापेक्षा दुसरे यश कोणते असू शकते... अनेकांना मी संचालन कार्यात मदत केली अनेकांना संधी दिल्या..चारोळ्या पासून ते सगळं लिहून दिल... मदत करणे हा माझा स्थायी स्वभाव... आणी दुसरा म्हणजे अभिनंदन करणे.. व्यक्ती मोठा असो की छोटा त्याने यश मिळविले की कोणाला आनंद होवो न होवो माझा अभिनंदन संदेश एकतर थेट त्यांच्या पर्यंत किंवा मग सोशल मीडिया च्या माध्यमातून होत असते.. मनाचा मोठेपन कायम टिकवून ठेवणे फार आवश्यक असते... याच निमित्ताने हजारो शेकडो कविता मला पाठ झाल्या... या काळात मी स्वतःला शांत डोक्याने काम करावे लागते... एवढीशी चुक जरी झाली तरी कार्यक्रमाचे तीन तेरा वाजतात... लिहायचे खूप आहे.. पण आतां थांबतो. या कार्यात आपण सर्व माझ्या सोबत आहात म्हणून हे यश गाठता येत आहे...200 वा कार्यक्रम पर्यंत लवकरच पोहचता येवो.. या साठी ला तुमच्या शुभेच्छा हव्या आहेत...कारण कालही,आजही आणी कदाचित उद्याही माझ्या पाठीमागे भक्कम पणे आधार देणारा कोणीच नव्हता,नाही आणी नसेलही पण तुम्ही मात्र आहात हे नक्की खरे...!!!

आपलाच... पराग भानारकर , नागभीड..!!!

 

  

Previous Post Next Post