Top News

नाटक : दोन घराचं गाव...

नाटक :  दोन घराचं गाव... 


नाटक पहिल्यावर नाटका बद्दल आपले मत व्यक्त करण्या साठी हा लेखन प्रपंच...!! - लेखक पराग भानारकर 


विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड 

    आदर्श-विद्या नाट्य कला मंडळ नागभीड च्या वतीने 20 जानेवारी 2024 रोजी व्यंकटेश नाट्य कला मंडळ,नवरगाव निर्मित सदानंद बोरकर सर लिखित व दिग्दर्शित 'दोन घराचं गाव' या पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत सर्वस्व गमावून बसलेल्या कुटूंबाच्या सत्य कहाणी वर आधारित या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.. हा नाटक पहिल्यावर नाटका बद्दल आपले मत व्यक्त करण्या साठी हा लेखन प्रपंच...!!

    व्यंकटेश नाट्य मंडळाला दोनशे वर्षाचा इतिहास झाडीपट्टी मधील पहिले नाटक नवरगाव ला झाल्याची माहिती आहे..सदानंद बोरकर यांची ही चौथी पिढी अतिशय उत्कृष्ठ पद्धतीने हा वारसा समोर नेते आहे..


• एक लेखक व दिग्दर्शक म्हणून सदानंद बोरकर सर यांनी आता पर्यंत अनेक वास्तववादी सामाजिक समस्येच्या मुळावर घाव घालणारे लेखन करून ते नाटक रूपात आपल्या समोर आणले आहे. नाटकाचा मूळ हेतू हा मनोरंजन सोबतच समाजिक प्रबोधनाचा आहे.. मात्र हल्ली यातील मूळ हेतू बाजूला सारून नाटक चळवळ हे केवळ व्यवसायिक होत आहे का हे चित्र दिसत असतांना बोरकरांनी अगदी समाजात घडलेल्या सत्य घटनेचा गाभा घेत त्याला आपल्या लेखणीचा तेजस्वी चंदेरी मुलामा चढवीला आहे.. अंधश्रद्धेला बळी पडलेल्या एका सुशिक्षित कुटुंबाची सत्य कहाणी वर आधारित 'माझं कुंकू मीच पुसलं ' या नाटकाची निर्मिती केली.. सगळीकडे हा नाटक हाऊसफुल ठरला... शेतकऱ्यांच्या वेदनेवर फुंकर घालणारे 'आत्महत्या' या नाटकाने 'सार्क' गाठलं.. आजारपणात टीव्ही वर एका मुलीने आत्महत्या केल्याची बातमी पाहून तिची शिक्षणाची ओढ लक्षात घेता व बापाने तिच्या लग्नाची केलेली घाई हे तिच्या आत्महत्येस घातक ठरते  हेच धरून अगदी गावखेड्यातील हलके फुलके विनोद व प्रसंग घेत त्यांनी राज्य शासनाच्या समाजिक वणीकरण,हागनदारी मुक्त योजना गाव या मोहिमेचे अगदी आपल्या नाटकातुन प्रसार व प्रचार केला.ते नाट्य प्रयोग म्हणजे  'अस्सा नवरा नको ग बाई..' बदनाम रत्याच्या संघर्ष: 'गंगा जमुना' या नाटकाच्या माध्यमातून देह व्यवसाय करणाऱ्या महिलांची बाजू न घेता अतिशय समर्पक पणे रेड लाईट भागात नेमक काय घडते.. देह व्यापार करणाऱ्या महिलांचे नेमके दुःख व सत्य घटना जिचा शोध लेखकाने तीन ते चार दिवस त्या गंगा जमुना परिसरात राहून घेतला व ते सगळे खरे पात्र त्यांनी या नाटकातून मांडले...!!!


   • मुळात दोन घराचं गाव या नाटकाची कथा ही सत्य घटनेवर आधारित आहे..  कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील एजिवडे या गावातील कांबळे कुटूंबाची ही सत्य  कहाणी आहे.. 2013 ला राधानगरी अभयारण्य साठी एजिवडे गावाचे  पुनर्वसन झाले.. त्यात सगळ्यांनी योग्य कागदपत्रे केली व त्यांचे स्थलांतर झाले मात्र कांबळे कुटुंबं हे कामाच्या शोधात सहा महिन्या साठी बाहेर राज्यात गेले असता त्यांच्या एका  कुटूंबाचे स्थलांतर झाले नाही.. आल्यावर त्यांनी ते काम केले पण प्रशासनाच्या लालफितशाही  धोरणा मुळे वारंवार सरकारी दप्तरच्या चकरा मारून काम होत नव्हते.. एकच घर त्यात आजूबाजूला हिस्त्र प्राणी यांचा सतत वावर,आरोग्य सेवा नाही.  जणू काही गे कुटुंब वणवासात  राहत होते..  अश्यातच एक दिवस नको ती घटना घडते आणी या कुटूंबातील 13 वर्षाचा मुलगा वाघाच्या हल्यात ठार मारला जातो.. आणी ही घटना घडल्याबरोबर 10 वर्षांपासून पुनर्वसनाची समस्या असलेल्या एका घराच्या कुटूंबापर्यन्त तब्बल 10 वर्षाने त्या ठिकाणी पत्रकार पोहचतात व मुद्दा उचलून धरल्यावर 2023 मध्ये त्यांना न्याय मिळतो.. मात्र तो न मिळाल्यासारखा असतो.. या सत्य घटनेचा आधार घेत एक घरच्या ऐवजी 'दोन घराचं गाव' या उत्तम अश्या नाट्य कलाकृतीचा जन्म झाला आहे...!!!


 • या नाटकाची मांडणी करताना लेखकाने दोन कुटुंब व त्यांच्या पुनर्वसणासाठी संघर्ष यातील एकदम संतुलित पद्धतीने मांडला आहे... आणी अगदी शालजोडीत शासनाच्या चुकीच्या धोरणावर आपली लेखणी चालवत लालफितशाहीत अडकलेल्या सामान्य जनतेचा आवाज रसिक जनतेपुढे व प्रामुख्याने सरकार पुढे मांडला आहे...!!


• या नाटकात एका कुटूंबात अण्णा, आई, मुलगा चिन्ना,मुलगी रंजी, चिन्ना ची पत्नी मंगल व त्यांचा मुलगा लालसू  असे एक  कुटूंब दाखवले आहे तर दुसऱ्या कुटूंबा मध्ये चोंगा, त्याचा मुलगा भल्ला, मुलगी मंगल,भल्ला ची आई लहान पनीच त्याला सोडून देवाघरी गेली असते.. दोन्ही कुटूंबाचा व्यवसाय शेती व दुधाळू जनावरापासून दूध काढून घनदाट जंगलातून विकायला नेवून उदरनिर्वाह करणे हाच असतो..!!!


• कामाच्या शोधात बाहेर राज्यात गेल्यामुळे गाव अभ्यरण्यात गेल्याने  पुनर्वसन होण्यासाठी कागद पत्रे न केल्याने दोन घर ही त्याचं ठिकाणी घनदात जंगलात राहतात त्यांच्या वाट्याला येणारे दुःख वेदना हे सहज व जिवंत प्रसंगातून लेखकाने मांडले आहे..अण्णा ( विजय मुळे) यांनी बापाची भूमिका दमदार केली आहे.. दुसऱ्या कुटूंबातील चोंगा ( विश्वनाथ पर्वते) याची मुलगी मंगल(सीमा गोडबोले) शिकलेली पण पायाने अपंग असते तिच लग्न जुळतो पण लग्न मंडपात सरकारी चपराशी असलेल्या वराकडून सायकल मागितल्याने मंगल ला ही गोष्ट पटत नाही ती लग्नाला नकार देते व जो मुलगा हुंडा देणार नाही अश्या मुलाशी लग्न करण्याची शपथ घेते यावेळी मंडपात असलेला अण्णा चा मुलगा चिन्ना (अंगराज बोरकर) हा मंगल सोबत लग्न करतो.. या प्रसंगात बापाची वर शोधताना कशी घालमेल व फसवणूक होते याची उत्तम मांडणी लेखकाने केली आहे...!!


• लग्न झाल्यावर चिन्ना व मंगल यांच्या संसार वेलीवर सुंदर असे फुल उमलते तत्यांचा अत्यानंद सगळ्या परिवाराला होतो. त्याचे नाव लालसू (चुनाक्ष चन्ने) असे ठेवले जाते. मंगल ही पायाने अपंग असल्याने सुरुवातीला सासू व सुनेत थोडा दुरावा असतो पण लालसू च्या येण्याने तो कायम मावळतो.. यात विशेष अस की, या सत्य घटनेतील पीडित कुटूंबातील महिला एका पायाने    अपंग आहे व या नाटकात सुद्धा मंगल च्या भूमिकेत असलेल्या सीमा गोडबोले यांनी हे अपंग असलेल्या पात्राची भूमिका अतिशय चोख पद्धतीने साकारलेली आहे..संपूर्ण नाटकात त्या कुठेही वाटू देत नाही की त्या अपंग असल्याचे अभिनय करीत आहेत.. यात आजाची भूमिका साकारणारे चंद्रसेन लेंझे यांनी आजाची भूमिका साकारताना अनेक वेळा संपूर्ण भरगच्च भरलेले सभागृह लोटपोट करून सोडल त्यांच्या विनोदाच्या टायमिंग ने रसिकांना ते भरभरून हसवितात... यातील अजून एक महत्वाचे पात्र म्हणजे रंजी ( देवयानी जोशी) चे अगदी सहज आणी सोप्या आपल्या बोलिभाषेतील संवादातून रसिकांना भुरळ पाडणारा अभिनय देवयानी जोशी यांनी या नाटकात केला आहे...मुळात हॉर्मोनियम वादक असलेल्या अभिजित संघेल याने चिन्ना व कलेक्टर बाबा यांची उत्तम भूमिका साकारलेली आहे.पूर्णवसन लवकर व्हाव व या जंगलाच्या प्रदेशातून सुटका व्हावी यासाठी जवळच्या गावातील रामशरण (सदानंद बोरकर) याच्या सोबत चिन्ना मैत्री करतो निवडणुकीत सदानंद ला मदत करतो..पण रामशरण मुळात गेलेली केस असते..एक नंबर चा दारुडया  माणूस.. रामशरन ची भूमिका केवळ 15 ते 20 मिनिटांची असली तरी सदानंद बोरकर यांच्या कसदार अभिनयाने ती भाव खाऊन जाते...!!


• पुनर्वसन लवकरात लवकर व्हावे यासाठी सरकारी कार्यालयात चकरा मारून थकलेले चिन्ना व भल्ला एक दिवस सरकारी कर्मचाऱ्यावर हात उचलतात त्यात त्यांना पाच वर्षाची सजा होते..यांनतर सुटून आल्यावर  चिन्नाचे दारूचे व्यसन वाढते... एके दिवशी त्याची दारू सोडवायला ज्या बाबाकडे जातात तो कलेक्टर बाबा चिन्ना चा एकेकाळाचा वर्गमित्र निघतो..त्याला पोक्सो कायद्याअतर्गत गुन्हा दाखल झालेला असतो व त्यातून मोकळा झाल्यावर तो असे ढोंगी बाबा चे काम करीत असतो.. सध्या समाजात असलेली ही ढोंगी प्रवृत्ती अतिशय विनोदी पद्धतीने लोकापुढे आणण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे..पुढे लालसू एके दिवशी घरबाहेर रुसून बाहेर गेला असता वाघाच्या तावडीत सापडतो व त्यात त्याचा जीव जातो.. यांनतर लालसू चे आई वडील मंगल व चिन्ना यांचे विदारक दुःख अतिशय वेगळ्या धाटणीने मांडले गेले आहेत..ते पाहताना अलगद डोळ्यात अश्रू येतात.. पुढे एक दिवस दारू पिल्याने चिन्ना ची तब्बेत खालावते तिथे योग्य आरोग्य सेवा नसल्याने बोगस डॉक्टर ( कमलाकर कामडी ) येतो व चुकीचे इंजेक्शन दिल्याने त्यात चिन्ना सुद्धा मृत्यू होतो.... आणी होत्याचे नव्हते होते.. त्यानंतर पत्रकार तिथे पोहचतात व लालसू च्या जीव गेल्यांनतर प्रशासनाला जाग येते व 10 लाख रुपयांचा पुनर्वसन मोबदल्याचा चेक घेऊन अधिकारी घरी येतात.. त्यावेळीचे मंगल चे सरकारला विचारलेले फार महत्वाचे प्रश्न निरुत्तर करून सोडतात..एकाच नाटकात अंधश्रद्धा,बोगस डॉक्टर, हुंडाबळी, पुनरवसन झालेल्या ठिकाणचे वास्तव, मांडणारे हे नाटक आपण प्रत्येकाने पाहिले पाहिजे... असे मला वाटते...!!


• सुरुवातीला काही काळ नाटक हे थोडे हातााबाहेर जाताना दिसते मात्र दुसऱ्या अंकात पुन्हा एकदा सावरून  सदानंद सरांची लेखणी वाटते.. लेखक  व कलाकारांनी पहिल्या अंकात बदल केले पाहिजे असे मला वाटते.सदर नाटकात बोलीभाषेचा वापर योग्य त्या पद्धतीने करण्यात आला असून विनोद करतांनाही अतिशय योग्य बोली भाषेचा वापर केला आहे..त्यात द्विअर्थी शब्दांचा वापर करणे लेखकाने टाळले आहे...!!!


 पराग भानारकर

        नागभीड..!!

8275294552..!!

• सहा.शिक्षक सरस्वती ज्ञान मंदिर,नागभीड

• पत्रकार : सकाळ वृत्तपत्र

• संचालक:आपुलकी फाउंडेशन नागभीड



Previous Post Next Post