तळोधी ते अयोध्या सायकलने प्रवास करून परतलेल्या महेश चे भाजप कार्यालय नागभीड येथे स्वागत...
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
नुकत्याच अयोध्या येथे पार पडलेल्या भगवान श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमा मुळे देशभर जे भक्तिमय वातावरण तयार झाले.त्यातच तळोधी येथील महेश शिवणकर या 25 वर्षीय रामभक्त युवकाने आपण तळोधी ते अयोध्या हा जवळपास 900 किलोमीटर पेक्षा जास्तचा प्रवास 13 जानेवारी ला तळोधी येथून सुरु केला.आणि हा प्रवास त्याने 10 दिवसात यशस्वीरित्या पूर्ण करून आल्याने आज भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयात त्याचा सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने तालुकाध्यक्ष संतोष रडके, विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर,जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आवेश पठाण,माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार, बंडू गेडाम,दिनेश समर्थ,सुनील शिवणकर,रमाकांत ठाकरे,दिलीप विगम,मनोहर चौधरी,आनंदजी कोरे,ज्ञानेश्वर भेंडारकर,धनराज ढोक,स्नेहाताई सिद्धमशेट्टीवार, मोजेश मरकाम,हेमंत नन्नावरे, राजू पिसे,विजय संदोकर,प्रकाश कुंभरे,प्रवीण गिरीपुंजे,राजेश मिसार,कृष्णा अमृतकर व मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
