Breaking News : नागभीड नगरपरिषद क्षेत्रात काँग्रेसला पडली मोठी खिंडार...
आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया व खासदार अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत नागभीड येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी शहराध्यक्ष रमेश ठाकरे यांच्यासह सहकाऱ्यांचा भाजपात पक्षप्रवेश.....
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
दि. ३१ जानेवारी / भाजपा महिला आघाडी तालुका चिमूर च्या वतीने खास मकरसंक्रांतीनिमित्त महिला-भगिनींसाठी अभ्यंकर मैदान, चिमूर येथे आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमाप्रसंगी आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया व खासदार अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत नागभीड येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी शहराध्यक्ष रमेश ठाकरे यांच्यासह महेश अलबनकर, रवि जांभुळकर, मंगेश कुंभारे, राहुल वाघाडे, सलमान पठाण, गौरव केणे व अन्य सहकारी कार्यकर्त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली देश बनत असून आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक एक पाऊल आत्मविश्वासाने टाकत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विकासाचा ध्यास असलेले राज्यातील नेतृत्व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या कार्यकर्तृत्वावर व विकसनशील ध्येय धोरणांवर विश्वास ठेवून भाजपात पक्षप्रवेश केला. यावेळी आमदार बंटी भांगडीया यांनी सर्वांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात सहर्ष स्वागत केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेशाप्रसंगी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्राजक्ता माळी, विविध भाजपा नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी नागभीड तालुकाध्यक्ष संतोष रडके, चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, विधानसभा वॉर रूम प्रमुख सचिन आकुलवार,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आवेश पठान,ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुमंपल्लीवार, महिला आघाडी अध्यक्षा इंदु आंबोरकर, माजी नगरसेवक रूपेश गायकवाड, बंडु गेडाम, दिनेश समर्थ,जहांगीर कुरेशी, संजय अमृतकर, शुभम चिल्लुरे, ओमप्रकाश मेश्राम सह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
