Top News

नागभीड सहकारी सोसायटी निवडणूक : भाजपा प्रणित शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय

 नागभीड सहकारी सोसायटी निवडणूक : भाजपा प्रणित शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय



नागभीड : तालुक्यातील सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ‘अ’ दर्जा प्राप्त नागभीड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपा प्रणित शेतकरी विकास पॅनल ने एकतर्फी विजय मिळवत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या निवडणुकीत काँग्रेस प्रणित शेतकरी पॅनलचा दारुण पराभव झाला.

सदर निवडणूक आमदार बंटी भांगडिया यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने नियोजनबद्ध प्रचार करत मतदारांचा विश्वास संपादन केला. परिणामी पॅनलचे सर्व 13 उमेदवार विजयी होत विजयाचा झेंडा रोवण्यात आला.

निवडणुकीत महिला प्रवर्गातून भावना गणेश तर्वेकर व निता प्रकाश बोरघरे या उमेदवार अविरोध निवडून आल्या. अनुसूचित जाती-जमाती गटातून अनिल दडमल, ओबीसी गटातून धनंजय राघोबा काटेखाये यांनी विजय मिळविला.

सर्वसाधारण गटात खटू विठोबा अमृतकर, गिरिधर रामदास अमृतकर, तानाजी काशिराम अमृतकर, रविंद्र श्रीहरी आंबोरकर, रमेश सदाशिव काळे, उमेश यशवंत चिल्लुरे, भूपेश महादेव चीलबुले, रामदास बबनराव बहेकार हे विजयी झाले. विशेष मागास प्रवर्गातून प्रवीण नामदेव बंडावार यांनी दमदार विजय नोंदविला.

या विजयामुळे नागभीड परिसरात भाजपा समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सहकार क्षेत्रात शेतकरी विकास पॅनलची ताकद पुन्हा अधोरेखित झाली आहे.

दरम्यान, या विजयाबद्दल भाजपा तालुकाध्यक्ष संतोष रडके, माजी अध्यक्ष बंडू क्षीरसागर, जिल्हा मध्यवर्ती बँक सचिव अवेश पठाण, संचालक गणेश तर्वेकर, माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

Previous Post Next Post