Top News

चंद्रपूर : अवैध जनावर वाहतुकीवर एलसीबीची मोठी कारवाई; ₹58.20 लाखांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर : अवैध जनावर वाहतुकीवर एलसीबीची मोठी कारवाई; ₹58.20 लाखांचा मुद्देमाल जप्त



चंद्रपूर  / संदीप तेलंग, उपजिल्हा प्रतिनिधी – शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवैध गोवंशीय जनावर वाहतुकीवर मोठी कारवाई करत दोन ट्रक आणि एका पायलट कारसह तब्बल 63 जनावरे जप्त केली. या कारवाईत सुमारे ₹58 लाख 20 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 7) एम.ई.एल. नाका, मुल रोड येथे एलसीबी पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. यावेळी दोन ट्रक व एका कारमधून अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक सुरू असल्याचे उघडकीस आले. जप्त करण्यात आलेल्या 63 जनावरांपैकी 2 जनावरे मृत अवस्थेत आढळली.

या प्रकरणी पोलिसांनी शेख हाशम शेख मोला, मोसिन बेग मुबारक बेग, शेख अन्सारी अशरफ मिया, समीर खान करीब खान, शेख जुनेद शब्बीर हुसेन, सोहेल (रा. गोयगाव, ता. राजुरा), इम्रान कुरेशी, सादीक कुरेशी, आवेश कुरेशी, वसीम कुरेशी तसेच ट्रक क्र. MH-34-AB-0379 चे चालक व मालक अशा एकूण 11 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. संबंधित आरोपींवर प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंध अधिनियम 1960, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 (सुधारित 2015) तसेच भारतीय न्याय संहिता कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत दोन ट्रक, एक कार, 63 गोवंशीय जनावरे आणि 6 मोबाईल फोन असा एकूण ₹58.20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद भुरले व सुनील गौरकर यांच्यासह पोलीस कर्मचारी नितीन साळवे, नितीन कुरेकर, सुभाष गोहोकर, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, प्रमोद कोटनाके, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, प्रसाद धुळगांडे तसेच सायबर सेलचे कार्तिक खनके व उमेश रोडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.

या घटनेमुळे जिल्ह्यात सक्रिय असलेल्या अवैध पशू तस्करीच्या जाळ्याचा पर्दाफाश झाला असून अशा बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा कडक संदेश देण्यात आला आहे.

Previous Post Next Post