रामधन कुंभारे यांच्या मागण्यांना नगराध्यक्षा स्मिता खापर्डे यांचा प्रतिसाद; समता कॉलनीत फलक अनावरण उत्साहात
नागभीड : नागभीड समता कॉलनी येथे आयोजित ' प्लॉट धारक फलक' विशेष सोहळ्याचे अनावरण नुकतेच संपन्न झाले. समता कॉलनी सौंदर्यीकरण आणि सुशासनात भर टाकणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. स्थानिक नागरिकांच्या सोयी आणि कॉलनीच्या प्लॉट धारकांच्या ओळखीसाठी नकाशा फलक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. समता कॉलनी येथे पूर्णत: परिणामकारक विकास आणि कॉलनीच्या अधिकृत सीमा निश्चित रहिवाशांनी एकत्रितपणे स्वखर्चाने 'प्लॉट धारक' नकाशा स्थापित केला आहे. यावेळी समता कॉलनीचे अध्यक्ष रामधन कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली फलकाचे अनावरण नागभीड नगरच्या नगराध्यक्षा स्मिता खापर्डे यांच्या शुभहस्ते पार पडले. अवेश खाँ पठाण नगरसेवक प्रभाग ६, नगरसेविका शिल्पा शेंडे, नागोराव गणवीर, आशा साखरकर, माजी प्राचार्य बिहारीलाल गजभिये, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रामधन भारे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करून,खालील बाबींवर भर देण्यात आला आहे:
पायाभूत सुविधांचा विकास, लेआउट-मधील खोदकाम केलेले रस्ते तत्काळ काँक्रिटी करण करणे, अवैध नाली वरील अतिक्रमण तत्काळ हटविणे, सांडपाणी निचऱ्यांसाठी पूर्णतः गाळ काढून,बंदिस्त नाली बांधणे, प्लॉट क्र.१ ते ३ स्थानी विद्युत वाहिनी (विद्युत लाइन) असून निवेदन देऊनही अद्याप हटवली नाही, प्लॉट क्र.१ ते ९ मागील स्थानी वाढलेली वृक्ष वाढल्याने घरांना मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याने,उपयोजना करणे.प्रत्येक प्लॉट धारकाचे अधिकृत 'आखीव पत्रिका' (प्रॉपर्टी कार्ड) तयार करणे,प्रलंबित अवैध अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी सौंदर्यीकरण करून, ग्रीन जिम सुरू करणे. सार्वजनिक वापर जागांवर अतिक्रमणे हटवून त्या सौंदर्यीकरण करण्याची शक्ती करण्यात आली"अवैध अतिक्रमण असताना कोणती तांत्रिक अडचण येत आहे? जर या शेवटच्या टप्प्यात ही प्रक्रिया सुरू झाली नाही,आम्हची विनंती मान्य केली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडू," - रामधन कुंभारे अध्यक्ष समता कॉलनी नागभिड
"समता कॉलनीतील नागरिकांनी स्वखर्चाने 'प्लॉट धारक फलक' तयार करून, नवीन आदर्श तयार केला आहे.यामुळे नागभिडातील प्लॉट धारक यांना प्रेरणा मिळेल. मूलभूत सुविधा पाणी, रस्ते आणि आरोग्य याकडे दुर्लक्ष केल्या जाणार नाही. प्रलंबित अतिक्रमण मुद्दा प्राध्यानाने सोडविण्यात येईल. प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी विश्वासात घेऊन मार्ग काढू"
- स्मिता खापर्डे नगराध्यक्षा नगर परिषद नागभिड
या सोहळ्याचे प्रास्ताविक सागर शंभरकर सचिव, संचालन राजेश पाटील तर आभार प्रदर्शन पाटील यांनी केले. यशस्वितेसाठी मनोहर झोडे उपाध्यक्ष,डॉ.मेघनाथ खोब्रागडे, वनसिंग डोर्लीकर, मंगल कोसे,भाऊराव कोरे , निमराव मेश्राम, संतोष कुंभारे, रंजना बावनकर,पाथोडे, रागिणी कुंभारे,पराग रामटेके, संजय मेश्राम,यांनी परिश्रम घेतले.या सोहळ्याला गुणप्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्याने प्लॉटधारक उपस्थित होते.
