नागभीड : राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी तथा सहाय्यक प्राध्यापक प्रा. प्रचल ढोक यांनी योगाचे महत्त्व, आरोग्यदायी जीवनशैलीतील त्याचे स्थान आणि नियमित योगाभ्यासाचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थितांना प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून त्याचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम समजावून सांगितले.
यानंतर वज्रासनातील विविध आसने, पोटावरील आसने तसेच पाठीवरील आसनांचा सराव करून घेण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. प्रचल ढोक यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले.
या कार्यक्रमास डॉ. विकास मोहतुरे, डॉ. रत्नप्रभा रुडे, प्रा. निलेश गोडे, डॉ. मनीष मत्ते, डॉ. अतुल नागपुरे, प्रा. चक्रधर भूर्रे, डॉ. अंकुश कायरकर, प्रा. प्रेमकुमार खोब्रागडे, प्रा. किशोर बोरकर, प्रा. नीरा सिंग, प्रा. धनंजय मडावी यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी नरेश देसाई, प्रदीप मोहुर्ले व इतर कर्मचारी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

