Top News

नागभीडच्या शिल्पा ठाकरे यांची SCERT पुणेच्या राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शकपदी निवड

 



नागभीड : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्या वतीने सन 2026-27 साठी इयत्ता तिसरी, चौथी आणि सहावीच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित सेतू अभ्यासक्रम निर्मितीसाठी नागभीड तालुक्यातील शिक्षिका कु. शिल्पा ज्ञानेश्वर ठाकरे यांची राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे चंद्रपूर जिल्हा आणि नागभीड तालुक्याला राज्यस्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असून शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी मानली जात आहे.

कु. शिल्पा ठाकरे या मिनाताई माध्यमिक विद्यालय, नवखळा (ता. नागभीड, जि. चंद्रपूर) येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सेतू अभ्यासक्रम निर्मितीची कार्यशाळा 15 ते 19 डिसेंबर 2025 या कालावधीत SCERT, पुणे येथे ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. याशिवाय विविध ऑनलाइन कार्यशाळांचेही आयोजन करण्यात आले होते. या प्रक्रियेनंतर तयार करण्यात आलेली सेतू अभ्यासक्रम पुस्तिका SCERT च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय अभ्यासक्रम निर्मिती प्रक्रियेत तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल शिल्पा ठाकरे यांनी SCERT पुणे, बालभारती, विज्ञान विभाग प्रमुख मनीषा ताठे, डायट चंद्रपूर तसेच पंचायत समिती नागभीडच्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त केले.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे सचिव योगेश गोन्नाडे, सहसचिव भारती गोन्नाडे, डायटचे प्राचार्य, शाळेचे मुख्याध्यापक गेडाम  तसेच शिक्षकवर्ग आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

शिक्षण क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण योगदानामुळे नागभीड तालुक्याचे नाव राज्यस्तरावर झळकले असून, इतर शिक्षकांसाठीही हा प्रेरणादायी ठरणारा सन्मान मानला जात आहे.


Previous Post Next Post