Top News

चंद्रपूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या जिल्हाध्यक्ष पदी चे अजय काबरा तर सचिव पदी राजेश कांकाणी यांची निवड





चंद्रपूर, प्रतिनिधी : विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटने अंतर्गत चंद्रपूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या 2026 - 29 या त्रैवार्षिक सत्रासाठी नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीची घोषणा महेश भवन येथे आयोजित सभेत करण्यात आली. समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांकडून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे .

नवीन कार्यकारिणीत अजय रमेशचंद्र काबरा (नागभीड) यांची जिल्हाध्यक्षपदी तर  राजेश श्यामसुंदर कांकाणी यांची सचिवपदी निवड करण्यात आली. तसेच  श्रीकांत मुंदडा (वरोरा) व  मनीष मालू (बल्लारशाह) यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.  नारायण तोषणीवाल यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून  गोपाल गंगाबीसन मुंदडा यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 



कार्यकारिणीत मनोहर कलंत्री (ब्रह्मपुरी) यांची सहसचिवपदी, प्रभाकर मंत्री यांची संघटन मंत्रीपदी,  अनिल राठी यांची प्रसिद्धी मंत्रीपदी तर  कमलकिशोर बजाज (राजुरा) व श्री हिरालाल बलदवा (चिमूर) यांची संयुक्त मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील बांधवांना कार्यकारिणीत स्थान दिल्याबद्दल समाजात हर्ष व्यक्त होत आहे . या नियुक्तीबद्दल चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार  कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया, विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटनेचे अध्यक्ष सीए  दामोदर सारडा तसेच जिल्ह्याचे निवर्तमान अध्यक्ष  शिवनारायण सारडा यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. 



माजी पदाधिकारी डॉ. सुशील मुंदडा, डॉ. जुगलकिशोर सोमाणी, उमेश चांडक, दिनेश बजाज तसेच विनोद मेहता, मनमोहन कलंत्री, विजय काबरा, अजय भट्टड व विद्यमान चंद्रपूर तालुकाध्यक्ष संदीप माहेश्वरी आणि तालुका सचिव हनुमान बजाज यांनीही नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देऊन संघटनेला नवीन उंचीवर नेण्याचा विश्वास व्यक्त केला. निवडणूक अधिकारी म्हणून सुधीर श्यामलालजी बजाज यांनी तर सहनिवडणूक अधिकारी म्हणून भरत चंद्रकांत बजाज यांनी जबाबदारी पार पाडली. नवनिर्वाचित कार्यकारिणीने समाजातील एकता बळकट करणे, सामाजिक विकासाला गती देणे, युवकांचा सहभाग वाढविणे तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

समाजातील सर्व बंधू-भगिनींनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशस्वी व उज्ज्वल कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. 


Previous Post Next Post