Top News

वीजपुरवठा उद्या 13 जून 2026 रोजी 6 तास बंद; देखभाल-दुरुस्तीचे काम




नागभीड :  महावितरणच्या नागभीड 33/11 केव्ही उपकेंद्रांतर्गत येणारे 11 केव्ही टेलिफोन एक्सचेंज, 11 केव्ही कृषीनगर आणि 11 केव्ही कानपा फिडर यांचा वीजपुरवठा शनिवार, 13 जून 2026 रोजी सकाळी 5.30 ते 11.30 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

महावितरणकडून उपकेंद्र आणि वीजवाहिन्यांच्या नियोजित देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी हा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात येणार आहे. संबंधित भागातील नागरिक, व्यापारी व शेतकऱ्यांनी आवश्यक नियोजन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

काम वेळेत पूर्ण झाल्यास वीजपुरवठा नियोजित वेळेपूर्वी सुरू करण्यात येईल. मात्र तांत्रिक कारणांमुळे वेळेत बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Previous Post Next Post