Top News

घरात व परिसरात साप आढळल्यास मारू नका; सर्पमित्रांना संपर्क करा सर्पदंश टाळण्यासाठी सतर्क राहा; सर्पमित्र साईनाथ चौधरी यांचे आवाहन

 





चंद्रपूर, प्रतिनिधी : पावसाळ्याच्या आगमनासोबतच विषारी व बिनविषारी सापांचा मानवी वस्तीत तसेच अडगळीच्या ठिकाणी वावर वाढत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रसिद्ध सर्पमित्र साईनाथ चौधरी यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात शेती हा प्रमुख व्यवसाय असून पावसाळ्यात सापांच्या बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे साप बाहेर पडून शेतात, घरांमध्ये तसेच सुरक्षित आश्रयाच्या शोधात विविध ठिकाणी आढळून येतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

साईनाथ चौधरी म्हणाले, “साप हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. तो उंदीर आणि इतर हानिकारक प्राण्यांवर नियंत्रण ठेवून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतो. साप कधीही विनाकारण माणसावर हल्ला करत नाही. त्यामुळे घरात किंवा परिसरात साप दिसल्यास त्याला मारण्याचा किंवा स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नये. तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा.”

परिसरात आढळणारे प्रमुख साप

विषारी साप :

बिनविषारी साप :

  • - धामण
  • - दिवड
  • - कुकरी
  • - तस्कर
  • - कवड्या

सर्पदंश झाल्यास अंधश्रद्धेला बळी पडू नका

सर्पदंश झाल्यास कोणत्याही मांत्रिक, भोंदूबाबा किंवा अंधश्रद्धेच्या उपचारांवर विश्वास न ठेवता तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत. योग्य वेळी उपचार मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात, असे सर्पमित्र साईनाथ चौधरी यांनी सांगितले.

चंद्रपूरमधील सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक

पावसाळ्यात घरात किंवा परिसरात साप आढळल्यास खालील सर्पमित्रांशी संपर्क साधावा :

  • - साईनाथ चौधरी – 8928139040 (बंगाली कॅम्प, संपूर्ण चंद्रपूर)
  • - अमित देशमुख – 9075707275 (तुकूम, संपूर्ण चंद्रपूर)
  • - विशाल रामेडवार – 8208509874 (पठाणपुरा, संपूर्ण चंद्रपूर)
  • - दिनेश खाटे – 9764092920 (तुकूम)
  • - रणजित मडावी – 9970158210 (इंदिरानगर)
  • - अजय यादव – 7722007414 (WCL परिसर)
  • - विशाल मडावी – 8550976772 (इंदिरानगर)
  • - यश निखरे – 7030355679 (बाबूपेठ)

पर्यावरण संरक्षणासाठी सापांचे संवर्धन आवश्यक असून नागरिकांनी साप दिसल्यास घाबरून न जाता प्रशिक्षित सर्पमित्रांची मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post Next Post