Top News

समिधा सेवा संस्था संचालित श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा




नागभीड : समिधा सेवा संस्था संचालित श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर व सचिव अजय काबरा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात प्राचार्या, मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांना सुट्ट्या असल्याने कार्यक्रमात विद्यार्थी संख्या कमी होती तर काही माजी विद्यार्थ्यांचा उस्फूर्तपणे सहभाग होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्या शुभांगी पोहेकर व मुख्याध्यापिका संगीता नारनवरे यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करत नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होत असल्याचे सांगितले.

यानंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले. सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, पद्मासन तसेच अनुलोम-विलोम यांसारख्या योगप्रकारांचा सराव करण्यात आला.

प्राचार्या शुभांगी पोहेकर म्हणाल्या, “निरोगी शरीर आणि निरोगी मनासाठी योग हा प्रभावी मार्ग आहे. दैनंदिन जीवनात योगाचा समावेश केल्यास आरोग्यदायी जीवनशैली विकसित होते.”

मुख्याध्यापिका संगीता नारनवरे यांनी सांगितले, “योगामुळे एकाग्रता, आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढण्यास मदत होते. प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प करावा.”

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. या उपक्रमातून योगाचे महत्त्व अधोरेखित करत निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.





Previous Post Next Post