Top News

चेकबरांज येथे आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन; नागरिकांनी घेतला लाभ

 चेकबरांज येथे आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन; नागरिकांनी घेतला लाभ


भद्रावती | तालुका प्रतिनिधी - सुनील दैदावार : तालुक्यातील चेकबरांज येथे कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (KPCL) व


बरांज कोल माईन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात परिसरातील नागरिकांची बीपी, शुगर तसेच इतर आवश्यक आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.

सदर आरोग्य शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र, डोंगरगाव यांच्या मार्फत आयोजित करण्यात आले होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय आसुटकर, डॉ. जुलमे तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, मांगली येथील डॉ. सोनी यांच्या नेतृत्वाखाली शिबिर सुरळीत पार पडले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीचे सभापती तथा ग्रामपंचायत चेकबरांजचे उपसरपंच राजू डोंगे यांनी विशेष पुढाकार घेत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रविंद्रजी (भावी मुख्य अभियंता, केपीसीएल), श्री जी. जिभकाटे (उपाध्यक्ष, बीसीएमपीएल), सुभाष गोहोकार (एचआर हेड, बीसीएमपीएल), रजनी मल्लया, विरेश बिजूर, संजीव भट्टाचार्य, आनंद राय, कानोबा दडमल, किशोर पुनवटकर, दिलीप पटेल व चंदन कुमार यांची उपस्थिती लाभली.

शिबिराचे वैद्यकीय नियोजन कंपनीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजानी यांनी अत्यंत उत्कृष्टरीत्या पार पाडले.

या आरोग्य शिबिरामुळे परिसरातील नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीचा लाभ मिळाला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post Next Post