23 एप्रिल रोजी भद्रावती नगरीत श्री संत सद्गुरु पादुकांचे दर्शन व पूजन कार्यक्रमाचे आयोजन
भद्रावती | तालुका प्रतिनिधी - सुनील दैदावार: स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर द्वारा गुरुपुष्यामृत योग तिथीवर श्री संत सदगुरू पादुका दर्शन व पूजन कार्यक्रम स्थानिक बाजार वार्ड, विठ्ठल मंदिर जवळ रविंद्र शिंदे यांच्या निवासस्थानी दिनांक २३ एप्रिल रोज गुरुवारला दुपारी 2 वाजेपासुन सायंकाळी 8 वाजेपर्यन्त आयोजित करण्यात आले आहे.
या सोहळ्यात श्री संत सद्गुरू गजानन महाराज (शेगाव), श्री संत सद्गुरू जगन्नाथ बाबा (भांदेवाडा) आणि श्री संत सद्गुरू बेंडोजी महाराज (घुईखेड) या संताच्या पादुकांचे दर्शन लाभणार आहे.
ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे, अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, सचिव रूपाली शिंदे यांच्या माध्यमातून दरवर्षी पादुका दर्शनाचा कार्यक्रम घेतला जातो. सदरचा श्री संत सदगुरू पादुका दर्शन व पूजन कार्यक्रम हा ट्रस्टचे उपक्रम “विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम” अंतर्गत घेण्यात येत आहे.
या मंगलमय सोहळ्यात सहभागी होऊन संताच्या पादुकांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या माध्यमातून आयोजकांनी केले आहे.
