रा. म. गांधी महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन पुण्यतिथी संपन्न....
नागभीड : राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय येथे ग्रंथालय विभागाच्या वतीने भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची पुण्यतिथी कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. प्रस्तुत कार्यक्रमाला महाविद्यालय अंतर्गत मुल्यांकन समिती समन्वयक प्रा. डॉ. विकास मोहतुरे यांनी डॉ. रंगनाथन यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांनी ग्रंथालयशास्त्रसाठी दिलेले योगदान याबद्दल सविस्तर माहिती दिली.
प्रस्तुत कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक प्रा. निलेश गोडे, ग्रंथपाल प्रा. चक्रधर भुर्रे प्रा . डॉ . अंकुश कायरकर, प्रा. टी.एम. शेंडे, कु. प्रगती रामटेके तथा इतर प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
