रा. म. गांधी महाविद्यालयात पालक मेळाव्या संपन्न...
नागभीड : राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथे पालक मेळावा महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. जी. डी. देशमुख याचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थी पालक भूषण देशमुख कृषी अधिकारी वडसा, शुभांगी पोहेकर, मुख्याध्यापक, ट्विंकल इंग्लिश स्कूल बुटले, सौ. देशमुख, महाविद्यालय अंतर्गत मुल्यांकन समिती, समन्वयक डॉ. विकास मोहतुरे यांची विशेष उपस्थिती लाभली. भूषण देशमुख यांनी “ विद्यार्थ्यांना घडविण्याची जेवढी जबाबदारी शिक्षकांची आहे तेवढीच जबादारी हि पालकांची सुद्धा आहे " असे सांगून “ विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याकरिता पालक व शिक्षकामध्ये विचारांची देवाणघेवाण असली पाहिजे. असे नमूद केले. शुभांगी पोहेकर यांनी “महाविद्यालयात चालू असलेले विद्यार्थी केंद्रित उपक्रम हे माझ्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरतीलच’ अशी अशा व्यक्त केली .
आयक्यूएसी समन्वयक डॉ. विकास मोहतुरे यांनी प्रास्ताविकेतून या कार्यक्रमाचा उद्देश आणि महाविद्यालयाची प्रगती व ओळख पालकांना करून दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांनी उपस्थित सर्व पालकांचे प्रथम आभार मानुन महाविद्यालयात दर्जेदार शिक्षण देण्याचा आम्ही निरंतर प्रयत्न करतो, त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक करीत आहेत व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आमच्यासाठी भूषणावह आहे’ असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निलेश गोडे यांनी केले. तर आभार प्रा. प्रमोद डबले यांनी मानले. प्रस्तुत कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
