पोलिस निरीक्षक विनोद चव्हान हे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या हस्ते सन्मानित.....
विदर्भ माझा न्युज 24 - घाटंजी
घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांचा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पियूष जगताप व पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील आदींच्या उपस्थितीत चषक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आला.
यवतमाळ जिल्हा पोलीस दलात दर महिन्याला हे परिषद घेतली जाते .सदर गुन्हे परिषद मध्ये मागील महिन्यात विविध हेडखाली सर्वात चांगली कामगिरी करणारे संबंधित पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.
यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड. अप्पर पोलीस अधीक्षक पियूष जगताप.पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी सातत्याने केलेल्या मार्गदर्शनामुळे पारवा पोलीस स्टेशनला यवतमाळ जिल्ह्यात सर्वात चांगली कामगिरी करणारे प्रथम क्रमांकाचे पोलीस ठाणे म्हणून पारवा पोलीस स्टेशनला गौरवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे महिला पोलीस शिपाई जयश्री गोरे यांचे सातत्याने संगणकीय चांगल्या कामगिरीमुळे पारवा पोलीस स्टेशन हा गौरव प्राप्त झालेला आहे.
सावळी सदोबा येथील पोलीस चौकीला स्वातंत्र्य पोलीस उपनिरीक्षक देऊन त्यांनी सर्वात मोठी कामगिरी केली इतरही कामाची दखल घेत पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आल्याने सर्कल मधून कौतुक केला जात आहे.
