Top News

ब्रह्मपुरी हद्दीत अवैध देशी दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; 5.60 लाखांचा मुद्देमाल जप्त

 



ब्रह्मपुरी |  पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी हद्दीतून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी कारवाई केली. या कारवाईत 1 लाख 60 हजार रुपये किमतीची देशी दारू आणि 4 लाख रुपये किमतीची Ford Figo कार, असा एकूण 5 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दि. 8 सप्टेंबर 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, गांगलवाडी मार्गे पाथरीकडे अवैधरित्या देशी दारूची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजा कुडेसावली येथे सापळा रचून छापा टाकला.

यावेळी आरोपी त्यांच्या ताब्यातील Ford Figo कार क्रमांक MH 31 BK 9242 मधून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी कारची तपासणी केली असता 90 ml क्षमतेच्या देशी दारूच्या एकूण 4,000 सीलबंद बाटल्या म्हणजेच 40 पेट्या आढळून आल्या.

5.60 लाखांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईमध्ये पोलिसांनी 1,60,000 रुपये किमतीच्या 40 पेट्या (4,000 नग) देशी दारूच्या बाटल्या तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 4,00,000 रुपये किमतीची Ford Figo कार जप्त केली. अशाप्रकारे एकूण 5,60,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

दोन आरोपी ताब्यात; एक फरार

या प्रकरणात सुनिल  नरुले आणि विपुल  मेश्राम यांच्यावर कारवाई करण्यात आली असून हरभजनसिंग सतनामसिंग हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तिन्ही आरोपी रा. हळदा, ता. ब्रह्मपुरी येथील असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे अप. क्र. 701/26 अन्वये कलम 65(अ), 83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने केली. कारवाईत PSI संतोष निंबोरकर, हेड कॉन्स्टेबल जयंत चुनारकर, संतोष येलपुलवार, सुनील आत्राम, अजित शेंडे आणि गजानन मडावी यांनी सहभाग होता .


Previous Post Next Post