भीषण अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी.....
सिमेंटचे वीज खांब नेताना अनियांत्रित होऊन ट्रॅक्टर झाली पलटी.....
हे ही वाचा 👉🏻 Breaking News_पुन्हा होनार नोटबंदी......
विदर्भ माझा न्युज 24 - मुल
मुल तालुक्यातील पिपरी दिक्षित गावाजवळ भीषण अपघातात अपघात दोन मजुरांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
ट्रॅक्टरवर सिमेंटचे वीज खांब नेताना अनियांत्रित होऊन ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरवर बसलेल्या दोन मजूरांचा जागीच मृत्यू झाला तर एक मजूर गंभीर जखमी झाला.
पाठी मागुन दुचाकी ने येणारा सुपरवायझर हे दृश्य बघताच घटनास्थळी बेशुद्ध पडला. ही घटना काल दी.19/5/2023 ला शुक्रवारी मुल तालुक्यातील पिपरी दिक्षित गावाजवळ घडली.
हे ही वाचा 👉🏻 Breaking News_पुन्हा होनार नोटबंदी.....
मिथून पांडुरंग मराठे (35), अंकुश राजू गंधश्रीवार (36) असे मृत मजुरांचे नाव असुन जखमी ईश्वर मांडवकर (37), तर पाठी मागुन दुचाकी ने येणारा सुपरवायझर सुभाष रणदिवे (34) हे दृश्य बघताच बेशुद्ध पडला. हे सर्व राहणार केळझर ता. मूल असे जखमी मजुरांचे नाव आहे.
मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित जवळील भंजाळी येथील एका शेतकऱ्यांच्या शेतात वीज डीपी लावण्याचे काम सुरु होते. त्यासाठी आवश्यक सिमेंट खांब ट्रॅक्टरच्या साह्याने पिपरी दीक्षितवरून आणतांना काही अंतर पार केल्यानंतर चालकाचे नियंत्रन सुटल्याने पिपरीजवळ ट्रॅक्टर पलटी झाला. यात दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाले.
हे ही वाचा 👉🏻 Breaking News_पुन्हा होनार नोटबंदी.....
सदर घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटना स्थळी धाव घेतली व त्यांना रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले असुन, मूल पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व पुढील तपास मुल पोलीस करीत आहेत.

