Top News

Financial help from MLA Vijay Wadettiwar to the youth who lost his leg in an accident in Sawli.

सावली येथील अपघातात पाय गमावलेल्या युवकास आमदार विजय वडेट्टीवार यांचेकडून आर्थिक मदत......



 विदर्भ माझा न्युज 24 - सावली 

 सावली शहरातील वॉर्ड क्र.१७, सावली तुकूम/ तीन कवाडी येथील रोशन दशरथ कत्तुलवार वय २८ वर्षे हा युवक घरातील कमवता व्यक्ती आहे. वडील खूप गरीब घरचे असून घरची आर्थिक परिस्थिती खूप हलाकीची आहे. त्यामुळे मिडेल ते काम करून रोशन घरखर्च चालवत असे, मागील ६ महिन्यापुर्वी धान चुरणी सुरु असताना रोशन कत्तुरवार याचा पाय थ्रेशर मशीन मध्ये अडकून पाय तुटला,कमावत्या व्यक्तीवर दुःखाचे संकट कोसल्याने उदरनिर्वाहा प्रश्न निर्माण झाला.

 या घटनेमुळे सावली शहरात हळहळ सुरु झाली, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे यांनी, सदर घटनेचे गांभीर्य समजून राज्याचे माजी मंत्री व लोकनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांना तात्काळ संपर्क करून रोशन दशरथ कत्तुलवार यांना पुढील उपचारासाठी व छोटा मोठा धंदा करून उदरनिर्वाह करण्यासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांचेकडून आर्थिक मदत पाठवली. सदर मदत सावली नं.प.च्या नगराध्यक्षा लता लाकडे यांनी रोशन कत्तुरवार यांना प्रदान केली.

 यावेळी कत्तुरवार कुटुंबियांनी आमदार विजय वडेट्टीवार, यांचे मनापासून आभार व्यक्त करताना  कुटुंबियांचे अश्रू अनावर आले होते," वडेट्टीवार हे देवदूता सारखे संकटावेळी धावून आलेत,असे प्रतिपादन रोशनचे वडील दशरथ कत्तुरवार यांनी प्रतिपादन केले. यावेळी नगरसेवक व काँग्रेस सावली शहराध्यक्ष विजय मुत्यालवार, नगरसेवक प्रफुल वाळके, सचिन सांगिडवार,नगरसेविका साधना वाढई, वॉर्ड क्र.१७ च्या नगरसेविका अंजली देवगडे, पल्लवी ताटकोंडावार,ज्योती गेडाम तसेच काँग्रेस जनसंपर्क कार्यालय व सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कमलेश गेडाम आदी गावकरी उपस्थित होते.

Previous Post Next Post