संतोष सिंह रावत यांच्यावर गोळी झाडनार्या आरोपींना पोलिसांनी केली अटक........
तपास अधिकाऱ्यासह दोन उपविभागीय पोलीस अधीकार्यांच्या बदल्या......
विदर्भ माझा न्युज 24 - मुल
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्यावर ११ में 2023 रोजी अज्ञात आरोपींनी गोळी झाडली होती. यानंतर जिल्ह्यातील राजकारणात खडबड उडाली होती. या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत होता सर्व बाजुंनी तपास केल्यानंतर सुद्धा आरोपी पोलिसांना गवसत नव्हते. .
जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहीत पंधरा दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे तपासाची सूत्रे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
तपासाची सूत्रे हाती येताच नायक यांनी वेगळ्या दिशेने तपास सुरू केला आणि चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथून दोन आरोपींना अटक केली विशेष म्हणजे दोन्ही आरोपी भाऊ असल्याचे बोलले जात आहे.
त्यापैकी एक संशयित आरोपी काँग्रेस चा पदाधिकारी आहे. या आरोपींनी संतोष रावत यांना नोकरीवर लावून देण्यासाठी पैसे दिले होते, नोकरी न मिळाल्याने रावत यांना पैसे परत मागितले होते, रावत यांनी पैसे परत करण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी रावत यांच्या वरती गोळ्या झाडल्या अशी दबक्या आवाजात चर्चा सध्या सुरू आहे.
जिल्ह्यातील तीन उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या बदल्या....
संतोष सिंह रावत गोळीबार प्रकरणाचे तपास अधिकारी व गडचांदूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांची बदली जळगाव शहरात करण्यात आली आहे. तर राजुऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांची उमरेड उपविभागात बदली करण्यात आली आहे. तसेच ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांची शहापूर येथे बदली करण्यात आली आहे. राज्य गृह विभागाकडून या बदल्या करण्यात आल्या आहेत.
संतोष सिंह रावत यांच्यावर ११ में ला गोळ्या झाडण्यात आल्या होत्या त्याच्या तपास पोलीस अधीक्षक यांनी गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्याकडे सोपवीला होता. त्या प्रकरणात सुशीलकुमार नायक यांनी तपासाला गती देत दोन आरोपींना अटक केली होती. त्यांची आज गृह विभागाकडून जळगाव शहर इथे बदली करण्यात आली आहे.

