MAHATET 2025 Scorecards Ready : महाटेट परीक्षेच्या गुणपत्रिका घेऊन जाण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 20 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 25 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेतील पेपर क्रमांक 1 (इयत्ता 1 ली ते 5 वी स्तर) आणि पेपर क्रमांक 2 (इयत्ता 6 वी ते 8 वी स्तर) यांचा अंतिम निकाल 3 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला होता.
या परीक्षेचे अंतिम गुणपत्रक जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयास प्राप्त झाले असून संबंधित उमेदवारांनी गुणपत्रिका तातडीने प्राप्त करून घ्याव्यात, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी केळकर यांनी केले आहे.
गुणपत्रिका घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
उमेदवारांनी गुणपत्रिका घेण्यासाठी खालील कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे :
- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र
- महाटेट गुणपत्रिकेची प्रत
- डी.एड. उत्तीर्ण गुणपत्रक / प्रमाणपत्र
- बी.एड. उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक
- आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र
- माजी सैनिक असल्यास संबंधित पुरावा
- ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / चालक परवाना / निवडणूक ओळखपत्र)
