Top News

नवेगाव पांडव प्राथमिक आरोग्य केंद्राचा NQAS बाह्य मूल्यांकन यशस्वी संपन्न...

नवेगाव पांडव प्राथमिक आरोग्य केंद्राचा NQAS बाह्य मूल्यांकन यशस्वी संपन्न...


नवेगाव पांडव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि. २६ व २७ नोव्हेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके (NQAS) अंतर्गत बाह्य मूल्यांकन (External Assessment) यशस्वीरीत्या पार पडले.


हे मूल्यांकन NHSRC च्या वतीने नियुक्त NQAS बाह्य मूल्यांकनकर्ते डॉ. अशोक कुमार (मूल्यांकन संघ प्रमुख) व  धार्मिक निनम्मा यांनी दोन दिवसांमध्ये पूर्ण केले. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व विभागांची (बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, प्रसूती कक्ष, लसीकरण कक्ष, प्रयोगशाळा, औषधसाठा, स्वच्छता, जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन, संक्रमण प्रतिबंधक उपाय, रुग्णसुरक्षा, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व प्रशासकीय दस्तऐवज आदी) सखोल तपासणी केली.


मान डॉ. अशोक कटारे सर जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मान डॉ. संदीप गेडाम सर ADHS (Leprosy), डॉ गजानन राऊत वैद्यकीय अधिकारी तालुका प्रशिक्षण पथक नागभिड व DQAC द्वारे सातत्यपूर्ण पाठपुरावा व मार्गदर्शनामुळे वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांनी उत्तम समन्वयाने तयारी केल्याने मूल्यांकन प्रक्रिया अतिशय सुरळीत पार पडली. केंद्राच्या गुणवत्ता सुधार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचे मूल्यांकनकर्त्यांनी कौतुक केले. 

सदर मूल्यांकन दरम्यान जिल्हा स्तरावरून मा.डॉ. प्रकाश साठे सर जिल्हा हिवताप अधिकारी चंद्रपूर, डॉ पराग जीवतोडे सर, डॉ प्रकाश भालेराव सर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) उपस्थित होते. तसेच डॉ. विनोद मडावी सर तालुका आरोग्य अधिकारी यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय नागभिड येथील अधिकारी, कर्मचारी यांनी सुद्धा विशेष सहकार्य केले.असेसमेंट दरम्यान प्रा.आ.केंद्र नवेगाव पांडव येथील सर्व कर्मचारी वृंद व आशा उपस्थित होते.



राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानकांनुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा जनतेपर्यंत पोहोचवणे अपेक्षित आहे. या मूल्यांकनामुळे नवेगाव पांडव प्राथमिक आरोग्य केंद्राला आणखी सुधारित सेवा देण्याची दिशा मिळणार असून, लवकरच मूल्यांकनाचे निकाल प्राप्त होण्याची शक्यता आहे.

Previous Post Next Post