GDC & A Exam 2026 : 26, 27 व 28 मे रोजी शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा
चंद्रपूर : सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (G.D.C. & A.) परीक्षा तसेच सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (C.H.M.) परीक्षा 26, 27 आणि 28 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
ही परीक्षा सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तसेच दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भवानजीभाई चौहान हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज चंद्रपूर येथे पार पडणार आहे.
परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना
ज्या परीक्षार्थ्यांनी 2026 च्या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, त्यांनी आपले ओळखपत्र युजर आयडीद्वारे डाउनलोड करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या उमेदवारांना ओळखपत्र मिळालेले नाही, त्यांनी खालीलपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून प्रोव्हिजनल ओळखपत्र तयार करून घ्यावे :
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- निवडणूक ओळखपत्र
- वाहन परवाना
- कार्यालयाचे ओळखपत्र
प्रोव्हिजनल ओळखपत्र जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जे. के. ठाकुर यांनी दिली.
