Top News

महाविकास आघाडी सरकार विरूद्ध बल्लारशाह मध्ये विदर्भ राज्य आंदोलन समिति तर्फे निर्देशने व ठीय्या आंदोलन

 महाविकास आघाडी सरकार विरूद्ध बल्लारशाह मध्ये विदर्भ राज्य आंदोलन समिति तर्फे  निर्देशने व ठीय्या आंदोलन 



विदर्भ राज्य आंदोलन समिति बल्लारशाह तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तर शहर अध्यक्ष राहीत लोनारे यांच्या  नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन व विज बिलाची होळी 





(विदर्भ माझा न्यूज़ 24 प्रतिनिधि) बल्लारशाह  :-  दिनांक 7 डिसेंबर 2020 रोजी सम्पूर्ण विदर्भात 11 जिल्हे व 120 तालुक्यात व शहराचा ठिकाणी महात्मा गांधीजींच्या स्मारकाला साकडे घालून महाराष्ट्र सरकार विरुद्ध चले जाव  आंदोलन करण्यात आले. 

     विदर्भ राज्य  आंदोलन समिति बल्लारशाह  तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार यांच्या प्रमुख उपस्थित व शहर अध्यक्ष रोहित लोनारे यांच्या नेतृत्वात बल्लारशाह शहरातील  वस्ती विभागात महात्मा गांधीजींच्या स्मारकाला माल्य  अर्पण करून साकडं घालून  आंदोलनाची सुरवात करण्यात आली .


  आंदोलनाचा प्रमुख मागण्या 

1) कोरोना काळात उद्योग , व्यापार सर्व बंद असल्यामुळे विदर्भातील जनतेचे कोरोना काळातील विज बिल माफ करण्यात यावे.

2)२०० यूनिट पर्यन्त विज बिल फ्री करा नंतरचे विज बिल निम्मे करा.

3) स्थिर आकर ,मीटर भाड़े, विज वहन कर, भार- अधिभार आदि बंद करा.

4) शेती पंपाचे विज बिल मुक्त करा.

5) शेती पंपाचे लोडशेडिंग बंद करा .

6) विदर्भातील शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळी नुकसानीची व अतिवृष्टि नुकसान भरपाई 25 हजार रु. प्रति हेक्टर सरसकट द्या व 65 मी. ली. पावसाची अट रद्द करा.

    या सर्व प्रश्नाचे एकच उत्तर स्वतंत्र विदर्भ राज्य त्वरित निर्माण करा. 

    या  प्रमुख मागण्या घेऊन आज ठिय्या आंदोलन व निर्देशन  करण्यात आले, शेवटी विज बिलाची होळी करून कोरोना काळातील विज बिल घेऊन जा रे मारबत या निर्देशना सहित आंदोलनाची समाप्ती करण्यात आली.




      या आंदोलनाची प्रस्तावना तालुका उपाध्यक्ष संजय घुगलोत यांनी केली तर आभार प्रदर्शन  तालुका सचिव गौतम कांबळे यांनी केले, या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी विराआस बल्लारशाह शहर सचिव संदीप केशकर, शहर उपाध्यक्ष सुनील कलवला,वस्ती विभाग अध्यक्ष राकेश बहुरिया, रोहन कळसकर,ज्याक फ्रांसिस  यानि अथक परिश्रम घेतले

 तर  या वेळी , सामाजिक कार्यकर्ते  ॲड . किशोर पुसलवार,कुशल बहुरिया वस्ती विभाग उपाध्यक्ष,राजेश बहुरिया वस्ती विभाग सचिव प्रतिक़  माटे, वस्ती विभाग कोषाध्यक्ष  रविकांत खेंगर, अभिनव शाहू ,श्रीनू  अंगूरी, शुभं बहुरिया,प्रतिक बहुरिया, विवेक रासुरवार,संजय कांबळे,राम अलवला,हर्शल कोंडेकर,सुमित रामटेके,राहुल देवइकर,राज गेडाम, साईं अलवला,इश्हार पेरका, देव्यांश ठाकुर ,साईं मुपिडवार  सह असंख्य विदर्भवादी कार्यकर्ते व विदर्भ प्रेमीची उपस्थिति होती.


Previous Post Next Post