Top News

६ डिसेंम्बर महापरिनिर्वाण दिना निमित्य नगरसेविका सौ.जयश्री किशोर मोहूर्ले यांच्या मार्फत 150 पुस्तकांचे वाटप

 ६ डिसेंम्बर महापरिनिर्वाण दिना निमित्य नगरसेविका सौ.जयश्री किशोर मोहूर्ले यांच्या मार्फत 150 पुस्तकांचे वाटप



वार्ड माझा,प्रयत्न माझा उपक्रम 







(विदर्भ माझा न्यूज़ 24 प्रतिनिधि  ) ,बल्लारशाह :- वार्ड माझा,प्रयत्न माझा या उपक्रमातून  संघमित्रा महिला व नवयुवक मंडळ,(महाराणा प्रताप वॉर्ड), व संघशील बहुउद्देशीय मंडळ(दादाभाई नौरोजी वॉर्ड) येथे 
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मूतीस अभिवादन करून उपस्थित सर्व लोकांना विविध पुस्तकांचे वितरण न.प.बल्लारपूर ची  नगर सेविका सौ.जयश्री किशोर मोहूर्ले व समाजसेवक श्री किशोर नानाजी मोहूर्ले यांच्या मार्फत करण्यात आले.यात विध्येची महानायिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आंबेडकरी साहित्य एक आकलन,बुद्ध विचारा सामोरील आव्हाने,भारताचे संविधान,राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्यावर आधारित  पुस्तकांचा समावेश होता.

या वेळी  दोन्ही मंडळाचे सर्व सदस्य श्री गुलाब टिपले,श्री रामा गाडगे,महेंद्र डोहने, चंदू दुर्गे,सुधाकर तावडे,संदेश दाहगवकर,रवी कोटारे, चरणदास दुर्गे,अमोल ढेपले,बापुरावजी तावाडे,मुन्ना दुर्गे,बंडू तावाडे,राहुल येवले,महेंद्र चुनारकर,रीता गाडगे,अरुणा निरांजने,मायाबाई दुर्योधन,उषा रामटेके,वैजयंताबाई दुर्गे,मीराबाई बोरकर,ललिताबाई दुर्गे,अन्नू दुर्गे,ललिताबाई दुर्गे आदी उपस्थित होते.

  


 

Previous Post Next Post