अवैध जनावर वाहतूक प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई....सहा आरोपी ताब्यात, ३७.४० लाखांचा मुद्देमाल जप्त.....
चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक होणाऱ्या जनावरांवर कारवाई करत दोन स्वतंत्र गुन्ह्यांत एकूण ०९ गौवंश, ४ म्हैशी व १ वगाराची सुटका केली असून चार पिकअप वाहनांसह मिळून ३७,४०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बल्लारपूरमध्ये तीन पिकअप वाहनांवर कारवाई
दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बल्लारपूर हद्दीतील मौजा मानोरा रोडवर नाकाबंदी करण्यात आली. पथकाने तीन पिकअप वाहने थांबवून पंचासमक्ष तपासणी केली असता वाहनांत ०९ गौवंश प्राण्यांना कोंबून कत्तलीसाठी नेले जात असल्याचे आढळून आले.
याप्रकरणी खालील आरोपींवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे :
(१) राहुल दशरथ नाकाडे (२) अनिल नारायण सहारे (३) रामेश्वर अरुण करंबे – तिघेही रा. ब्रम्हपुरी
(४) रणजीत पुंजाराम ढोंगे व (५) पिंटु सय्यद – रा. ब्रम्हपुरी
(६) पहेलवान – रा. लक्कडकोट
त्यांच्याविरोधात कलम ११(१)(घ)(ड)(च)(ज) भारताचा प्राण्यास कुरपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, कलम ५(अ), ५(ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, तसेच कलम ४९ भारतीय न्याय संहिता अंतर्गत पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कारवाईत महिंद्रा बोलेरो पिकअप — MH33-T-0452, MH34-BZ-5083, MH34-BG-3956, किंमत अंदाजे २७ लाख रुपये, तसेच ०९ गौवंश प्राणी अंदाजे २.७० लाख रुपये, असा एकूण २९.७० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.
रामनगर हद्दीत आणखी एक पिकअप वाहन पकडले
रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुनोना फाटा येथे नाकाबंदी दरम्यान नांदेडमार्गे कत्तलीसाठी नेले जात असलेले एक पिकअप वाहन पकडण्यात आले. तपासणीदरम्यान ०४ म्हैस व १ वगार कोंबून नेण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणात आरोपी :
(१) पांडुरंग विठ्ठल तडेकोट (२) तिरुपती तुळशीराम सादगिरे (३) अर्जुन लक्ष्मण येडगे — तिघेही रा. नांदेड
यांच्यावर कलम ११(१)(घ)(ड)(च)(ज) भारताचा प्राण्यास कुरपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
कारवाईत वाहन क्रमांक MH26-CH-3601 किंमत रु. ६,००,०००/-, तसेच जनावरे किंमत रु. १,७०,०००/-, असे एकूण ७.७० लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले.
कारवाईस मार्गदर्शन व सहभाग
ही संयुक्त कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कॉक्रेटवार, बलराम झाडोकार, पोउपनि विनोद भुरले, संतोष निंभोरकर, सफौ धनराज करकाडे, पोहवा सुरेंद्र महतो, जयंत चुनारकर, पोअं. प्रदीप मडावी, अजित शेन्डे, सुमित बरडे, प्रफुल्ल गारगाटे, नितेश महात्मे, चापोअं मिलिंद टेकाम यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
