कांपा जंगलात धडक मोहीम! नागभीड पोलिसांची मोठी कारवाई; अवैध हातभट्टीवर घातला आळा – तब्बल ₹२.१७ लाखांचा मुद्देमाल नष्ट.......
नागभीड, २४ नोव्हेंबर : कांपा जंगल परिसरात फोफावलेल्या अवैध मोहा हातभट्टी व्यवसायावर नागभीड पोलिसांनी जोरदार धडक कारवाई करत मोठा घाव घातला. गोपनीय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल ₹२,१७,१०० किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला. पोलिसांच्या या अचूक आणि प्रभावी कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसायाला मोठा चाप बसला आहे.
पहिल्या कारवाईत पोलिसांनी
२५० लिटर मोहादारू,
१,८०० लिटर मोहा सडवा,
मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले.
या वेळी २६ वर्षीय आदित्य प्रदीप उके हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.
दुसऱ्या कारवाईत
२०५ लिटर मोहादारू,
१,५०० किलो मोहा सडवा
आणि साहित्य जप्त करण्यात आले.
या छाप्यात २७ वर्षीय रोहित प्रकाश अलोणे हा देखील पळून गेला. दोन्ही ठिकाणी जप्त केलेला मुद्देमाल कायद्यानुसार ताब्यात घेऊन जागेवरच नष्टीस टाकण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तर पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या नेतृत्वात पोउपनि अजिंक्य गोविंदलवार,कर्मचारी किशोर देशमुख, भरत घोळवे, ज्ञानेश्वर गिरडकर, विशाल पेंदाम, संदीप मडावी व दामोदर करंबे यांनी संयुक्तपणे केली.
नागभीड पोलिसांची ही धडक कारवाई अवैध दारूविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठी चालना देणारी ठरली आहे. परिसरात पोलिस विभागाच्या तत्परतेची जोरदार चर्चा सुरू!
