Top News

भाजप तालुका अध्यक्ष संतोष रडके यांची कठोर भूमिका; बंडखोरांना पक्षातून व पदावरून काढण्याची प्रक्रिया सुरू

 भाजप तालुका अध्यक्ष संतोष रडके यांची कठोर भूमिका; बंडखोरांना पक्षातून व पदावरून काढण्याची प्रक्रिया सुरू



नागभीड – भारतीय जनता पक्षाने अधिकृतरित्या जाहीर केलेल्या उमेदवारीनंतर, काही इच्छुकांना पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आले. मात्र तरीही काही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अधिकृत निर्णयाला विरोध करत अपक्ष उमेदवारी दाखल करून बंडखोरीचा मार्ग स्वीकारला आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप तालुका अध्यक्ष संतोष रडके यांनी वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानुसार कठोर पावले उचलण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, “पक्षाच्या शिस्तीला तडा देणाऱ्या आणि अधिकृत उमेदवारांच्या विरोधात उभे राहणाऱ्या बंडखोरांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. पक्षविरोधी कार्य करणाऱ्या व्यक्तींना पक्षातील सर्व पदांवरून मुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली असून हे निर्णय पक्षाच्या धोरणानुसारच घेतले जात आहेत.”

पक्षाशी प्रामाणिक राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा आदर राखत, तालुक्यात भाजप मजबूत राहावा यासाठी कडक निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही रडके यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, “भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. पक्षाच्या निर्णयाचा अनादर करून निवडणुकीत गोंधळ निर्माण करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही.”

Previous Post Next Post