देवराव भोंगळे यांचा उमेदवारी अर्ज खारीज करा..... सुरज ठाकरे व भूषण फुसे यांची मागणी...
चंद्रपूर :- भारतीय जनता पार्टी च्या वतीने 70, राजुरा विधानसभा मतदार संघाअंतर्गत उमेदवारी दाखल केलेले उमेदवार देवराव भोंगळे यांच्या चारही अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. यासंदर्भात देवराव भोंगळे यांनी अर्जांमध्ये काही महत्त्वाची माहिती जाणूनबुजून लपवून ठेवल्याने हे चारही अर्ज तातडीने फेटाळण्याची मागणी सुरज ठाकरे आणि राजुरा विधानसभा क्षेत्राचे उमेदवार भूषण फूसे यांनी पत्रकार परीषदेत केली आहे.
भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सरकारने दिलेल्या माहितीचा तपशील मांडला. चारही उमेदवारी अर्जात टाकलेली माहिती चुकीची आणि आक्षेपार्ह आहे. त्यामुळे सूरज ठाकरे आणि भूषण फुसे यांनी भोंगळे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्याची माहिती दिली आहे.
