Top News

Former_Minister_of_State_Dr. _Ramesh_Kumar_Gajbe's_entry_into_Bharatiya_Janata_Party

माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे यांच्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश....



नागभीड ::  वंचित बहुजन आघाडी मागील काही वर्षापासून पूर्व विदर्भ संयोजक प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत असलेले माजी राज्यमंत्री डॉ. रमेश कुमार गजबे यांनी संयोजन प्रमुख पदासह वंचितच्या प्राथमिक सदस्य पदाच्या राजीनामा वंचित चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. चिमूर विधानसभा मतदारसंघातील माना समाजाचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र आशिष गजबे यांनी आज मंगळवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे व माजी आमदार मितेश भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत कोराडी, नागपूर येथील निवासस्थानी स्वगृही भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला आहे.


याप्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे व माजी आमदार मितेश भांगडीया यांनी डॉ. रमेशकुमार गजबे व आशिष गजबे यांचे पुष्पगुच्छ भेट देऊन पक्षात सहर्ष स्वागत केले तथा अभिनंदन करीत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


यावेळी भाजयुमो प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा युवा नेते संकेत बावनकुळे, भाजपा चिमूर तालूकाध्यक्ष राजू पाटील झाडे व विविध भाजपा नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.


 चिमूर विधानसभा क्षेत्रात माना समाजाचे नेतृत्व म्हणून डॉक्टर रमेशकुमार गजबे यांनी राजकारणात वेगळा ठसा उमटविला आहे. बहुजन समाज पार्टी कडून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. युती शासनाच्या 1995 ते 1999 या कार्यकाळात काही महिने त्यांनी राज्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती. मागील विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कडून ते उमेदवार होते. दरम्यान वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित असलेली उद्दिष्टे व पक्ष विस्तारता यशस्वी होऊ शकली नसल्याची जाणीव ठेवत यंदाच्या निवडणुकीत पक्षाला अपयश येऊ नये यासाठी पूर्व विदर्भ संयोजक प्रमुख व प्राथमिक सदस्य पदाच्या राजीनामा देत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रात डॉक्टर रमेशकुमार गजबे यांच्या प्रवेशा मुळे भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपात डॉक्टर गजबे यांच्या प्रवेश झाल्याने चिमूर विधानसभेतील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

Previous Post Next Post