Top News

ब्राम्हपुरीतून अभिमानाची बातमी!

ब्राम्हपुरीतून अभिमानाची बातमी!


STEM Podar Learn School ला CBSE ची अधिकृत मान्यता 





ब्राम्हपुरी – शहरातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा नवा टप्पा गाठत STEM Podar Learn School, Bramhapuri या शाळेला आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (CBSE) अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे. शाळेला Secondary School Level पर्यंतचे CBSE Affiliation मिळाले असून, हा ब्राम्हपुरीकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.

शाळेचा CBSE Affiliation Number – 1131502 आणि School Code – 31491 असा आहे. या मान्यतेनंतर STEM Podar Learn School मध्ये विद्यार्थ्यांना आता राष्ट्रीय दर्जाचे CBSE अभ्यासक्रमासह आधुनिक STEM आधारित शिक्षण मिळणार आहे.

शाळेचे प्राचार्य आणि व्यवस्थापन यांनी सांगितले की, “Podar Education Network” च्या माध्यमातून STEM आधारित शिक्षण, अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि अनुभवी शिक्षकवर्ग यांचा संगम ब्राम्हपुरीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यामुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट शिक्षणाची दारे उघडली आहेत.

या यशाबद्दल शाळेच्या व्यवस्थापन समितीने सर्व पालक, विद्यार्थी आणि शुभेच्छुकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. त्यांनी सांगितले की, ही मान्यता शाळेच्या प्रगतीच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल.
Previous Post Next Post