नागभीडमध्ये नगर परिषदेतर्फे लोकार्पण, भूमिपूजन व उद्घाटन सोहळे उत्साहात संपन्न...
नागभीड : सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी नगर परिषद नागभीडतर्फे विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन व उद्घाटन सोहळे मोठ्या उत्साहात पार पडले.
महाराष्ट्र अग्निशमन सेवा आणि सेवांचे बळकटीकरण या अंतर्गत नव्याने उभारलेल्या अग्निशमन केंद्र इमारतीचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. तसेच दलित वस्ती योजनेअंतर्गत स्मशानभूमी सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन पार पडले.
याचबरोबर नगर परिषद क्षेत्रातील ६ “आपले सेवा केंद्र” यांचे उद्घाटन झाले. तर पंतप्रधान आवास योजना २.० अंतर्गत अंगीकार अभियान राबवून नागरिकांना जनजागृतीबरोबरच योजनांचा लाभ मिळविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे ठिकाण अग्निशमन केंद्र, नागभीड येथे असून नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
सदर लोकार्पण, भूमिपूजन व उद्घाटन सोहळे आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया यांच्या हस्ते पार पडले. या वेळी नगर परिषद मुख्याधिकारी सोनम देशमुख, माजी नगराध्यक्ष उमाजी हिरे, माजी उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अवेश पठाण,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गुलजार धम्मानी, अजय काबरा, हमीद जादा, माजी नगरसेवक रुपेश गायकवाड, पराग गुंडेवार, सामाजिक कार्यकरते मंगेश कावळे, प्रकाश कुमरे सह आदी मान्यवर स्थानिक नागरिक, न. प. कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
