Top News

पूरग्रस्तांसाठी तरंगिनीचा माणुसकीचा तरंग — तहसीलदारांकडे सुपूर्द केला मदतीचा धनादेश!

पूरग्रस्तांसाठी तरंगिनीचा माणुसकीचा तरंग — तहसीलदारांकडे सुपूर्द केला मदतीचा धनादेश!



नागभीड : राज्यात गेल्या दिवसापासून पावसाने हाहाकार माजवला असून मराठवाड्याला याची सर्वात जास्त झळ पोहचलेली असून  राज्यातील शेतकरी आज आत्महत्येच्या दारात उभा आहे.. या पावसाने आलेल्या पुरस्थितीने मोठ्या प्रमाणात हजारो हेक्टर वरील हातातोंडाशी आलेले पिक उध्वस्त झालेले आहे, अनेक घरांची पडझड झालेली आहे, घरातील अन्य धान्य वाहून गेलेले असून हजारो लोकांवर उपासमारीची वेळ आली आली सरकार आपल्या परीने मदत करते आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या तरंगिनी रास गरबा ग्रुप च्या वतीने सामाजिक भान जपत या पूरग्रस्तांना तीन हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. मदतीचा धनादेश नागभीड येथील तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्या कडे सुपूर्द केला आहे. 'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत' असे आपण  रोज प्रतिज्ञेत म्हणत असतो हिच बांधिलकी जपत राज्यात या पुरपरिस्थिमध्ये अडकलेले आपलेच भाऊ - बहीण असून अश्या संकटाच्या वेळी सरकार सोबत एक सजग नागरिक म्हणून उभे राहणे हे आपले कर्तव्य असून ते आपण जपले पाहिजे असा संदेश या छोट्या मदतीच्या माध्यमातून तरंगिनी च्या वतीने देण्यात आलेला आहे. मदतीचा धनादेश देतेवेळी नागभीड तहसील चे तहसीलदार प्रताप वाघमारे साहेब, नायब तहसीलदार कावळे साहेब यांची उपस्थिती होती. यावेळी तरंगिनीचे संचालक प्रियाताई लांबट, भाविशाताई पटेल, आरतीताई टहलानी, रोमी कटारे, गणेश नागापुरे, वैभव पिसे, पराग भानारकर, प्रणय दरवरे, निलेश मिसार यांची उपस्थिती होती..

Previous Post Next Post