आर. एम. जी. कॉलेज नागभीड ची विद्यार्थिनी कु. राबिया रियाज जादा हिला भौतिकशास्त्रात सुवर्णपदक
नागभीड : आर. एम. जी. कॉलेज, नागभीड येथील विद्यार्थिनी कु. राबिया रियाज जादा हिने गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या B.Sc. (Summer 2025) परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
याचबरोबर तिने भौतिकशास्त्र (Physics) या विषयात सुवर्णपदक (Gold Medal) मिळवून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. राबिया ही R.M.G. कॉलेजच्या इतिहासातील भौतिकशास्त्र सुवर्णपदक मिळवणारी चौथी विद्यार्थिनी ठरली आहे.
महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, प्राचार्य तसेच सहविद्यार्थ्यांनी या कामगिरीबद्दल तिचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.
राबियाच्या या यशामुळे R.M.G. कॉलेज नागभीडचा गौरव वाढला असून हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
मुख्यसंपादक तथा संपादक
पराग रीता सुरेश गुंडेवार
8668781673
