ओबीसी आरक्षणाचा तोडगा निघेपर्यंत निवडणूकींना स्थगीती द्या - विवेक खुटेमाटे
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने रविवार दिनांक १२ जुन २०२२ रोजी रामशेठ ठाकुर स्पोर्टस कॉम्प्लेक्स शेलघर, सेक्टर १६ घाटकोपर स्टेशन जवळ उलवे रोड नवी मुंबई येथे एकदिवसीय मंथन शिबीराचे आयोजन केलेले होते दरम्यान या शिबीराला दिल्लीहुन प्रमुख नेते कॅ. अजयसिंग यादव (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभाग), आमदार नाना पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांना ओबीसी समन्वय समिती बल्लारशाह तर्फे नीवेदन देण्यात आले.
सदर निवेदन ओबीसी आरक्षणासशिवाय निवडणूकांना स्थगीती देण्यात यावी म्हणून ओबीसी समन्वय समिती, बल्लारशाह अध्यक्ष विवेक खुटेमाटे यांच्या मागदर्शनात देण्यात आले. सदर कार्यक्रमात बाळासाहेब थोरात ( महसुल मंत्री महाराष्ट्र राज्य) उपस्थित असुन तसेच राज्यातील कॉंग्रेसचे सर्व मंत्री महोदय आजी-माजी खासदार - आमदार यांच्या मार्फत मार्गदर्शन करण्यात आले.नीवेदन देताना उमाकांतजी धांडे, वसंत ऊमरे,संदिप अस्वले,आशीष वाढरे यांचे सहकार्य लाभले.
नीवेदनात मटले आहे की आम्ही निवेदना मार्फत आपण दिलेल्या ओबीसीचा इंम्पेरिकल डाटा गोळा करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला गेला त्या मुळे ओबीसीची जात निहाय जनगणना होईल व केंद्र व राज्य यात ओबीसी जनतेला आरक्षण मिळेल या आदेशाचे समर्थन करतो आणि स्वागत सुध्दा करतो. आमच्या माहिती नुसार आणि सर्व परिस्थितीत असे मंडल आयोगाने ओबीसी जनगणनेचा करार, आरक्षण व भागीदारी करीता केंद्र सरकारला प्रस्ताव दिला आणि अंशता मान्य सुध्दा झाला. परंतु त्या नंतर पुढे कधीही जातीनिहाय जनगणना झाली नाही ज्यामुळे ओबीसी समाजावर वारंवार अन्याय होत आलेला आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात तसेच इतर क्षेत्रात सुध्दा मागास आहे. वर्तमानात आपल्याच आदेशानुसार ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका जाहीर करण्यात आल्या. हा ओबीसी समाजावर अन्याय नाहि का? कधीपर्यंत आमचा वापर करण्यात येईल. आमचा हक्क केव्हा मिळेल. कधी इंम्पेरिकल डेटा म्हणून आरक्षण रद्द तर इतर शासकीय कारणे पुढे आणली जातात आणि अश्या प्रकारे ओबीसी समाजाची दिशाभूल करण्याचे प्रकार सुरू आहेत. महाराष्ट्रातील वर्तमानात महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री यांनी इंम्पेरीकल डेटा गोळा करण्याचे आदेश शासकीय यंत्रणेला दिले गेल्याची बातमी प्रसार माध्यमांद्वारे प्राप्त झाली.
आणी पून्हा आपणास एवढीच विनंती आहेत की गोळा केलेला डाटा देण्यात यावा ज्यामुळे ओबीसी जनगणना यंत्रणेला सुद्धा ताकत मिळेल. यामुळे खरी माहिती समोर येईल त्या मुळे आम्हांला पंजाबराव देशमुख पाटीलाचे स्वप्न आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी लिहिलेल्या संविधानावर आमचा पूर्ण विश्वास आहे. महाविकास आघाडी सरकार वर सुद्धा ओबीसीची जातनिहाय जनगणना नक्की करेल यात शंका नाही असे ही या निवेदनात ओबीसी समन्वय समिती बल्लारशाह ने म्हन्टले आहे.
