Top News

दोन मैत्रिणींचा अपघातात मृत्यू......

दोन मैत्रिणींचा अपघातात मृत्यू......बि.ए.प्रथम वर्षाचा पेपर द्याला जात असतांना भीषन अपघात......



विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा



विद्यापीठाची परीक्षा आयुष्याची अंतीम परीक्षा ठरली राजुरा येथील शिवजी महाविद्यालय येथील दोन मैत्रिनींचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

सविस्तर वृत्त असा आहे की, पेपरची तयारी करून दुपार पाळीत असलेल्या बी. ए. प्रथम वर्षाच्या पेपरला छगुणा भिवसन झाडे (वय २०) व अंजली नंदलाल मेश्राम (वय २०) दोन्ही मैत्रिनी राजुरा येथील शिवाजी महाविद्यालय येथे १:३० वाजता असलेल्या पेपरला आपल्या स्कुटीने जात असताना दुपारी एक वाजताच्या दरम्यान राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी- खमोना दरम्यान गडचांदूर मार्गे जात असलेल्या मोटारसाईकल ने धडक दिल्याने दोघीही रस्त्यावर पडल्या यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने दोघीचाही जाग्यावर दुर्दैवी मृत्यू झाला.


निंबाळा येथील छगुणा व अंजली या दोघी पूर्वी पासून मैत्रीनि होत्या. दोघीही चिंचोली (खु) येथील छत्रपती शिवाजी महाराज कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कला शाखेच्या प्रथम वर्षाला शिकत होत्या. यावर्षी चिंचोली (खु) महाविद्यालयाचे उन्हाळी परीक्षा केंद्र राजुरा येथील शिवाजी महाविद्यालय असल्याने दोन्ही मुली नुकत्याच सुरू झालेल्या उन्हाळी परीक्षा कला शाखेच्या प्रथव वर्ष दुसऱ्या सेमिस्टरचा समाजशास्त्र विषयाचा पेपर देण्यासाठी छगुणा स्वतःच्या वाहनाने अंजलीला घरून निंबाळा येथून पेपरसाठी निघाल्या मात्र नियतीला ते मान्य नसल्याने पंधरा किमी अंतरावर गेल्या असता समोरून भरधाव येणाऱ्या एका मोटारसाईकलने धडक दिल्याने दोघीही डोक्यावर पडल्या यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे दोघीचाही जाग्यावर दुर्दैवी मृत्यू झाला.


सदर घटना रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना दिसली असता पोलिसांना माहिती मिळताच राजुरा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहचले. दोन्हीही मृत्यदेह ताब्यात घेत उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे उत्तरीय तापसणीकरिता नेण्यात आले. घटनेची माहिती गावात पसरताच संपूर्ण गाव शोकाकुल झाला असून समोरील तपास राजुरा पोलीस करीत आहे.

Previous Post Next Post