Top News

सेलोटेप ने बांधले हात पाय....मग डोक्यावर फोडल्या दारूच्या बाटला.....युवकचा जागीच मृत्यु......

सेलोटेप ने बांधले हात पाय....मग डोक्यावर फोडल्या दारूच्या बाटला.....युवकचा जागीच मृत्यु......


नाशीकला जायच्या तयारीत असलेल्या आरोपींना घेतले पोलिसांनी ताब्यात.......


तीन मुख्य आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले......



विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)


 जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी तिघा मित्रांच्या सहाय्याने सेलो टेपने हातपाय बांधून व तोंडाला चिकट पट्टी चिकटवून डोक्यात दारूच्या बाटला घालून हत्या करण्यात आल्याची घटना काल मंगळवारच्या रात्री 14 जुन ला चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागातील रामाळा तलावाच्या जवळील एका शासकीय इमारतीत घडली असुन राहूल विलास ठक वय 30 रा. हैद्राबाद बॅके जवळ पेठ वार्ड, राजूरा असे मृताचे नाव आहे.

सदर युवक हा डॉ. स्वप्निल चिल्लरवार यांचेकडे वाहन चालकाचे काम करीत होता. मंगळवारी  14 जून ला रात्री 9 वाजताच्या दरम्यान पोलीस नियंत्रण कक्ष येथील डायल 112 ला कॉल वरून माहिती प्राप्त झाली की, ज्युबली शाळेच्या मागे पडक्या इमारतीच्या वर एक चिकटपट्टीने गुंडालेले पुरूषाचे प्रेत पडुन आहे.


 सदर माहितीवरून पोलीस नियंत्रण कक्षाने चंद्रपूर यांनी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पो.स्टे. रामनगर, पो.स्टे. चंद्रपूर शहर यांना माहिती दीली. त्यानुसार संबंधीत पो.स्टे. व शाखेचे प्रमुख तात्काळ घटनास्थळी पोहचले असता ज्युबली शाळेच्या मागे जिल्हा परीषद वसाहती जवळील शिक्षण भवनाच्या जुण्या व पडक्या ईमारतीचे स्लॅपवर हातापायाला व मानेला चिकटपट्टी गुंडलेल्या एका 25 ते 30 वयोगटातील पुरूषाचे प्रेत दिसून आले.

प्रथम दर्शनीने पाहीले असता सदर इसमाचा खुन झाल्याचे दिसून आले. त्यावरून घटनेचे गांभीर्य ओळखून चंद्रपूर पोलीस अधीक्षक साळवे यांनी तात्काळ मृतक इसमाची ओळख पटवून त्याचे मारेकरी शोधण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखा व पो.स्टे. चंद्रपूर शहर यांना दिल्या.

 सदर घटनेचे गांभीर्य ओळखून या बाबत पोलीस निरीक्षक, बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी त्यांचे अधिनस्त असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक, जितेंद्र बोबडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक, संदीप कापडे यांचे दोन पथक तयार करून मयत इसमाची ओळख व आरोपी शोध संबंधाने त्यांना सुचना दील्या.


सदर पथक मृतक इसमाची ओळख व त्यास मारणाऱ्या इसमाचा शोध घेत असता. मयत इसमाबाबत गोपनिय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, यातील मयत इसम नामे राहूल विलास ठक वय 30 वर्षे रा. हैद्राबाद बॅके जवळ पेठ वार्ड, राजूरा जि. चंद्रपूर हा असल्याचे निष्पन्न करण्यात यश आले. त्यानंतर पो.स्टे. चंद्रपूर शहर येथे अप. क्र. 327/2022 कलम 302, 201 भा.द.वी. अन्वये गुन्हा नोद करण्यात आला.

पोलिसांनी सदर गुन्ह्यातील संशयित इसमाचा शोध घेणे सुरु केले, कोणताही ठोस व सबळ पुरावा आरोपींनी घटनास्थळावर ठेवला नव्हता. आरोपीचे शोध संबंधाने स.पो.नि. संदीप कापडे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांना मुखबीरव्दारे खबर मिळाली की, मयत हा डॉ. चिल्लरवार यांचे दवाखान्यात गाडी चालक म्हणून काम करीत होता. तेव्हा अंदाजे 1 वर्षापुर्वी त्याने एका स्त्री सोबत मोबाईलवर काहीतरी मेसेज केले होते त्यावरून त्यांच्यात वाद झाला होता व त्या स्त्रीच्या दोन मुलांनी मृतकास मारहाण केली होती. 

अशी गोपनिय माहिती प्राप्त होताच स्थानिक गुन्हे शाखाचे पथक सदर महिलेचा शोध घेवून तिचे घरी जावून तिला व तिच्या पतीला तिच्या मुला बाबत विचारपूस केली असता. लहान मुलगा घरीच मिळून आला व मोठा मुलगा हा नाशिक येथील एम.आय.डी.सी. मध्ये कामाला असून पत्नीसह नाशिक येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यावरून मुलगा नामे वैभव राजेश डोंगरे हा सध्या नाशिकला आहे किंवा कसे या बाबत माहिती घेतली असता तो मागील तिन दिवसांपासून नाशिक वरून चंद्रपूर ला आल्याची माहिती मिळाली.

त्यावरून चंद्रपूर येथील त्याचे जवळचे मित्र कोण या बाबत माहिती घेतली असता त्यांचा मित्र नामे संदीप उर्फ गुड्डू राजकुमार बर्लेवार वय 30 वर्षे रा. इंदीरा नगर, चंद्रपूर यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता. तो कोणतेही समाधान कारण उत्तरे देत नव्हता. नमुद इसमास विचारपूस चालू असतांनाच खास गोपनिय सुत्रांकडून विश्वसनिय माहिती मिळाली की, नामे वैभव डोंगरे हा त्याचे एका साथीदारासह नाशिकला जाणार आहे.

 अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाले वरून त्यांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. वैभव डोंगरे व त्याचे सोबत असलेला त्याचा मित्र नामे कार्तीक रमेश बावणे वय 25 वर्षे रा. आंबेडकर चौक सिंदेवाही यांना विचारपूस केली असता. वैभव डोंगरे याने सांगीतले की, त्यांचा मयत याचेशी मागील 1 वर्षा आधी झालेल्या वादावरून त्याचे साथीदार नामे संदीप उर्फ गुड्डू राजकुमार बर्लेवार वय 30 वर्षे रा. इंदीरा नगर चंद्रपूर व  कार्तीक रमेश बावणे वय 25 वर्षे रा. आंबेडकर चौक सिंदेवाही यांचे मदतीने रात्रौच्या दरम्यान ज्युबली शाळेचे मागे जिल्हा परीषद क्वार्टर जवळील शिक्षण भवनाचे जुण्या व पडक्या इमारतीचे स्लॅपवर मयत नामे राहूल विलास ठक वय 30 वर्षे रा. हैद्राबाद बँके जवळ पेठ वार्ड, राजूरा जि. चंद्रपूर यास नेवून त्याला त्या ठिकाणी दारू पाजून त्याचा गळा आवळून व डोक्यावर दारूच्या काचेचे बॉटलने वार करून जिवानीशी ठार मारले व जवळ असलेल्या चिकटपट्टीने बांधून प्रेत त्याच ठिकाणी ठेवून निघून गेले. सदर गुन्हयात नमुद तिनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पो. स्टे. चंद्रपूर शहर करीत आहे.

Previous Post Next Post