Top News

पर्यावरण पर्यटक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने युवासेनेकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पर्यावरण पर्यटक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने युवासेनेकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार



 विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)


 युवासेना प्रमुख तसेच पर्यावरण पर्यटक मंत्री मा आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवासेना कडून बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिल्ड, मिठाई व वृक्ष देऊन करण्यात आला. 

यावेळी विद्यार्थ्यांना युवासेना , युवतीसेना कडून आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचा केक कापून त्यांच्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा देतांना उच्च शिक्षणासाठी शासनाच्या ज्या शिष्यवृत्ती योजना आहेत त्याबद्दल ही मार्गदर्शन करण्यात आले.



 माझी वसुंदरा या अभियानांतर्गत वृक्ष भेट देऊन पर्यावरण संवर्धन करायसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा व त्याचे महत्त्व इतरांना सांगावे याकरिता वृक्ष भेट देऊन पालकांचे सुद्धा यावेळी अभिनंदन करण्यात आले. 

सदर कार्यक्रम शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा युवासेनेचे प्रा निलेश बेलखेडे, जिल्हा चिटणीस विनय धोबे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले.



 यावेळी युवासेनेचे समन्वयक विक्रांत सहारे,युवासेना बल्लारशाह उपजिल्हा प्रमुख सुमीत अग्रवाल,  युवती सेना उपजिल्हा प्रमुख रोहीनी पाटील, विपश्यना मेश्राम,  उपशहर प्रमुख करन वैरागडे, समीर मेश्राम, तालुका समन्वयक नागेश कडूकर, अश्विन देवतळे, सागर धनसकार, प्रदीप शिवनकर, युवतीसेना तालुका प्रमुख प्रगती पडगेलवार, सुनिधी इंगोले, बुटले, आरती समुद्रपुरवार  यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Previous Post Next Post