Top News

बल्लारशाह शहरात आम आदमी पार्टी चा १७ जुन‌ला जल त्याग आंदोलन - रविकुमार पुप्पलवार

बल्लारशाह शहरात आम आदमी पार्टी चा १७ जुन‌ला जल त्याग आंदोलन  - रविकुमार पुप्पलवार


महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या विरोधात आप चे आंदोलन.........



विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह 


 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे अधिकारी, कर्मचारी व पाण्याच्या समस्येने त्रस्त नागरीकांन सोबत दिनांक 17 जून 2022 रोजी एक दिवसीय जलत्याग धरणा आंदोलन आप तर्फे जाहीर करण्यात आले आहे, आंदोलनात शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, शहर उपाध्यक्ष अफजल अली, महिला शहर उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी हे सदर आंदोलनत जलत्याग करून धारणा देणार आहेत.

बल्लारशाहच्या जनतेला आप चे आवाहन...

  आपल्या हक्काची लढाई आता आपल्यालाच लढायची आहे, हे परंपरागत राजकारणी आणि त्यांचे पक्ष फक्त "पैसा आणी सत्ता" आणि "सत्तेतून पैसा" कमावण्याचा धंदा करत आहेत, त्यांच्या स्वार्थासाठी आमचा मतदानाचा हक्क "खरेदी आणि विक्री" करत आहेत, सर्वसामान्यांना सहानुभूती/आश्वासन देऊन आमची पिळवणूक करत आहेत, सध्याचे राजकीय पक्ष आम्हाला मुलभूत सुविधा देऊ शकत नाहीत, सत्तेसाठी धर्म, जात, भाषेच्या नावाखाली आमच्यात फूट पाडून त्यांचा धंदा चालवत आहेत. आता आपल्याला संघटीत होऊन, परिवर्तन घडवून आणण्याची सद्याची गरज आहे।

 

प्रमुख मागन्या.....


 १) पिण्याचे शुद्ध पाणी द्यावे.

 २) जुनी पाण्याची बिले माफ करा, शहरातील प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शन द्या.

 3) मनमानी नळ बिले पाठवणे थांबवा.

 ४) घरचे आणि सार्वजनिक नळ ठराविक वेळेत सोडा.

 5) शहरात अनेक जुनी पाइप लाइन गळती आहेत, ती त्वरित बंद करा.

 6) 24×7 पाणी योजना सुरू करा, नंतर मीटर रीडिंग प्रमाणे बिल घ्या, नाहीतर सरासरी बिल द्या.

 7) बल्लारशाह शहरातील नवीन पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सदोष आहे, ते त्वरित दुरुस्त करा।

Previous Post Next Post